Ajit Pawar | ‘खोक्याची घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली अन् धक्काबुक्की केली’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राच्या विधानभवनाच्या (Maharashtra Legislative Assembly) पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अभूतपूर्व धुमश्चक्री पाहायला मिळाली. आजपर्यंतच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करायचे. आज सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (NCP MLA Amol Mitkari) आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Shinde Group MLA Mahesh Shinde) यांच्यात धक्काबुक्की झाली. यासाऱ्या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच आजच्या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांवर आगडपाखड करत शिंदे गटाच्या (Shinde Group) जखमेवर अजित पवारांनी (Ajit Pawar) मीठ चोळले.

 

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) दुसरा आठवडा सुरु असून आज कामकाजाचा पाचवा दिवस आहे. आम्ही विरोधी पक्षातील (Opposition Party) बहुतांश आमदार दररोज सकाळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करतो. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना हे दाखवलं नाही. शेवटी लोकशाहीत (Democracy) सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करायचं असतं आणि विरोधकांनी जनतेच्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत आवाज उठवायचा असतो. आपण बघाल तर देशातील सर्व राज्यांमध्ये असंच चालतं, पण राज्यातील सत्ताधाऱ्यांना आमची घोषणाबाजी, आम्ही केलेले आरोप खटकले. ते जाणीवपूर्वक आक्रमक झाले. खोक्यावरुन केलेली घोषणाबाजी त्यांच्या जिव्हारी लागली आणि त्यांनी धक्काबुक्की केली, अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सत्ताधाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं.

 

जे झालं ते बरोबर नाही

विरोधी पक्षाचे आमदार दररोज सकाळी हसतखेळत घोषणाबाजी करत होते.
पण साताऱ्याच्या कोरेगावचे आमदार (Koregaon MLA) महेश शिंदे यांनी मिटकरींना शिवीगाळ केली.
दोघांमध्ये वाद झाला. या दरम्यान पत्रकारांनाही धक्काबुक्की झाली. जे काही झालं ते बरोबर नाही.
शेवटी घोषणाबाजीचा अधिकार हा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांनाही आहे.
बाकी काहीही असलं तरी खोक्यावरुन केलेली घोषणाबाजी विरोधकांच्या जिव्हारी लागली म्हणूनच त्यांनी धक्काबुक्की केली,
असं म्हणत राज्यातील सरकार कोणत्या कारणातून पाडलं, ते त्यांनी सांगावं असा सवालही अजित पवारांनी विचारला.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar comment on some maharashtra bjp mlas and mlas of maha vikas aghadi enter into a war of words outside the state assembly

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा