Ajit Pawar | मंत्रिमंडळाचा ‘तो’ निर्णय फसवा, धुळफेक करणारा; अजित पवारांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – NDRF निकषांच्या दुप्पट मदत करण्याचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. NDRF निकषांमध्ये अनेक घटकांचा समावेश नाही. शेतमजूर, व्यापारी, टपरीधारकांनाही मदत करण्याची गरज आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले. कोरडवाहूसाठी हेक्टरी 75 हजार तर बागायतीसाठी दीड लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, तसेच 3 हेक्कटरची मर्यादा शिथील करण्याची मागणी अजित पवारांनी (Ajit Pawar) केली.

 

आतिवृष्टीकाळात शेतमजूरांचे रोजगार बुडाल्याने त्यांनाही मदत केली पाहिजे. घरातील भांडी, कपड्यांच्या नुकसानीसाठी प्रतिकुटुंब 3 हजार 800 रुपये मदत देणे एनडीआरएफचा निकष आहे. तो दुप्पट करुनही भागणार नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) भांडी, कपडे व अन्नधान्यासाठी प्रत्येकी 5 हजारांप्रमाणे प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबाला 15 हजार रुपये दिले होते. पूर्ण पडलेल्या घरांसाठी दीड लाख रुपये तर अंशत: नुकसानीसाठी सरसकट 50 हजारांची मदत दिली होती, असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

राज्य सरकारच्या (State Govt) मंत्रिमंडळाने अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी घेतलेला निर्णय (Maharashtra Cabinet Decision) फसवा आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे.
यामुळे अतिवृष्टीग्रस्तांना कसलाही आधार मिळणार नाही. त्यामुळे सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा.
अन्यथा अतिवृष्टीग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनात (Legislative Session) आवाज उठवण्यात येईल.
तसेच एनडीआरएफचे निकष सुधारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरवा करण्यासाठी सरकारला भाड पाडू असेही अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar on maharashtra cabinet decision slam eknath shinde and devendra fadanvis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोच्या कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आजपासून बदल

 

RBI Action On Rupee Co-Operative Bank | रुपी बँकेचा RBI कडून परवाना रद्द

 

Nashik Crime | पहिल्या मजल्यावरुन पडल्याने 18 महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू