Ajit Pawar | ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ ! बारामतीमधील खुनाच्या घटनेचा ‘विषय’ अधिवेशनात; अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती मध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी तिच्या वडिलांचाच खून (Baramati Murder Case) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या नंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ असं स्टेटस ठेऊन खून केल्याचे नमूद केले. तसेच अशा अल्पवयीन आरोपींविरुद्ध (Juvenile Accused) कठोर कारवाई करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी त्यानी केली.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, 17 ऑगस्टला पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरवात झाली आणि 18 ऑगस्टला शशिकांत नानासाहेब कारंडे (Shashikant Nanasaheb Karande) हे मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले असताना दोन ते तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले. ते मुलीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडले, हे अतिशय भयानक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.

 

आणि या मुलाने थेट खून केला
याच अल्पवयीन मुलाने यापूर्वी अशाचप्रकारे मुलीला त्रास दिला होता. तेव्हा तो 17 वर्षाखालील म्हणजे अल्पवयीन आहे म्हणून पोलिसांनी त्याला केवळ बोलवलं आणि वादासंदर्भात बाल न्यायालयासमोर (Juvenile Court) हजर केलं. न्यायालयाने त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर मुलीचे वडील शशिकांत कारंडे यांनी मुलाला असं करु नकोस असं समजावून सांगितले. त्यानंतर पुन्हा काही गोष्टी घडल्या आणि त्या मुलाने त्यांचा खून केला, असं अजित पवारांनी सभागृहात सांगितले.

घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है
या गोष्टीच्या खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की, संपूर्ण राज्यात या अल्पवयीन मुलांमध्ये असे संघर्ष होत आहेत. आरोपीने खून करण्यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियावर ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ असं स्टेटस ठेवलं आणि मग खून केला. राज्यात अल्पवयीन मुलांवर वाढत्या सोशल मीडियाचा (Social Media) दुष्परिणाम होत असल्याचे अजित पवार म्हणाले.

 

अल्पवयीन मुलांना सोडून न देता कारवाई करा
व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवणं (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram),
फेसबुक (Facebook) इत्यादी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने समाजातील अल्पवयीन मुलांवर याचा परिणाम होत आहे.
त्यामुळे अल्पवयीन मुलांनी गुन्हा केला तर त्याला बालगृहात पाठवणे अथवा सोडून देणे,
असं न करता कडक कारवाई (Strict Action) करावी लागेल.
अन्यथा ही लहान मुंल म्हणून दुर्लक्ष केलं तर समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
हीच घटना 18 ऑगस्टला बारामतीत घडली. याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी,
अशी मागणी अजित पवार यांनी केली.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar raise issue of side effects of social media and murder in baramati of pune district in assmebly session

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी गुन्हा

 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

 

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे