Ajit Pawar | अजित पवारांनी जरंडेश्वर बाबतचे आरोप फेटाळले, ‘त्या’ 65 कारखान्यांची नावे केली जाहीर; किरीट सोमय्यांनाही दिलं ‘हे’ चॅलेंज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन–  जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) बाबतीत होत असलेल्या आरोप आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून (Central Investigation Agency) होत असलेल्या चौकशीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. साखर कारखान्यांच्या संदर्भातील होणारे सर्व आरोप खोटे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने छापे (Income tax department raid) टाकले होते. यानंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं.

 

अजित पवार यांनी सांगितले की, राज्यात गेल्या 15 वर्षांमध्ये जवळपास 65 साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेने (State Co-operative Bank) लिलावाद्वारे विक्री केली
तर 11 कारखाने हे भाडेतत्त्वावर चालवायला दिले असल्याचे सांगत केवळ अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या कारखान्यांवर बेछूट आरोप होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भ्रष्टाचाराचा आरोप खोटा

 

जरंडेश्वर साखर कारखान्यावरुन होणाऱ्या टीकेवर आज उत्तर दिलं. महाराष्ट्रातील साखर कारखानदारीबद्दल अनेक बातम्या आल्या.
मी अनेकदा उत्तर देणं टाळलं. वस्तुस्थिती समोर यावी म्हणून आज बोलत आहे. एसीबी (ACB), पोलीस (Police) आणि सहकार विभाग अशा वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी केली.
मात्र त्यात काहीही निष्पन्न झालं नाही. साखर कारखान्यासंदर्भात खोटी आकडेवारी देऊन आरोप केले जात आहेत.
25 हजार कोटींचा भ्रष्टाचार (Corruption) हा खोटा आरोप आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.

 

अजित पवार पुढे म्हणाले, जरंडेश्वर 66 कोटी 77 लाख गुरु कमोडिटी मुंबई (Guru Commodity Mumbai) यांनी विकत घेतला.
नतंर BVG च्या हनुमंत गायकवाड (Hanumant Gaikwad) यांनी तो कारखाना चालवला त्यांना तोटा आला म्हणून त्यांनी दुसऱ्या कंपनीला विकला.
जरंडेश्वरचं नाव घेऊन माझ्या नातेवाईकांच्या नावाने टीका केली जात आहे.

 

जरंडेश्वरची सर्वाधिक किमतीला विक्री

 

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री ही सर्वाधिक किमतीला झाली असूनही तीन आणि चार कोटी रुपयांत कारखाने विकले गेले.
त्याबाबत कोणीच कधीच प्रश्न उपस्थित करत नाही. केवळ आपण महत्त्वाच्या पदावर असल्यामुळे काहीजण केवळ काही वकील आणि सीए कामाला लावून,
दौरे करुन आरोपांची राळ उठवत असल्याचा आरोप अजित पवार यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे नाव न घेता केला आहे.

 

किरीट सोमय्यांना चॅलेंज

 

किरीट सोमय्या यांच्या वरती बदनामीचा खटला दाखल करणे बाबत विचारले असता अजित पवार यांनी आपल्याला अनेक महत्त्वाचे काम असल्याचं सांगितलं.
त्यातच लहानपणी आपल्याला शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असा सल्ला वडीलधाऱ्यांनी दिला होता अशी आठवणही त्यांना सांगितली.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेने 11 कारखाने भाडेतत्त्वावर देण्याची टेंडर काढले आहे.
त्यापैकी एखादा कारखाना भाड्याने घेऊन ऊन बेछूट आरोप करणाऱ्यांनी तो चालवून दाखवा… कारण कारखाना चालवणं हे येरागबाळ्याचे काम नाही हे त्यांना समजेल, असा टोला त्यांनी लगावला.

 

अजित पवार भडकले

 

भाजप (BJP) सोबत दीड दिवसाच सरकार बनवून बाहेर पडल्यामुळे भाजप जाणीवपूर्वक कारवाई करतंय का ? असं विचारल्यावर मात्र अजित पवार भडकले आणि त्यांनी मला जे करावं वाटलं ते मी केलं माल तो अधिकार आहे. त्यामुळे असले फालतू प्रश्न मला विचारु नका असं म्हणत त्यांनी भाजप सोबतच्या संबंधाच्या कटू आठवणींवर भाष्य करणं टाळळं.

 

Web Title : ajit pawar | ncp leader ajit pawar reaction on jarandeshwar sugar factory allegation ajit pawar challenge to kirit somaiya in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra School Reopen | शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून इयत्ता 1 ली ते 4 थी ची शाळा सुरू होण्याचे संकेत

BJP MLA Madhuri Misal | बिबवेवाडीतील अल्पवयीन मुलीच्या खून खटल्यासंदर्भात भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केली ‘ही’ महत्वाची मागणी

Ajit Pawar On Pune Metro | ‘शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम दिवाळीनंतर सुरू करणार’