Ajit Pawar | … तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. सुरुवातीला महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांचे बिगूल वाजणार आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर सर्व पक्षांमध्ये अलबेल वातावरण आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य निवडणूकांत कोणती समीकरणे जुळून येणार यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनीही भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मतांची विभागणी होऊ न देता जागा वाटप योग्यरितिने झाले तर स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीकडे निश्चितपणे येतील असे म्हंटले आहे.

अजित पवार म्हणाले, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढायचे की नाही हा ज्या त्या पक्षाच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे. कोणी काय बोलाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, आगामी निवडणूकांना सामोरे जाताना प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय व भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे त्या ठिकाणी तिघांनी एकत्रित लढायचे की दोघांनी की स्वतंत्र लढायचे हा त्या जिल्ह्याचा अधिकार आहे. कारण इथ बसून आपण त्या जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेऊ शकत नाही. आता जरी वाटत असले तरी तेथील परिस्थिती बदलूही शकते. त्यामुळे तेथील स्थानिक परिस्थिती काय आहे ते पाहूनच तेथील स्थानिकांनी निवडणुकीसंदर्भात निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. सध्या प्रत्येकजण आपापले पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Ketaki Chitale | केतकी चितळेला ‘त्या’ प्रकरणात ठाणे कोर्टाचा धक्का, न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

दरम्यान, आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याचे संकेत देत आहे. तर दुसरीकडे भाजप मनसेबरोबर जवळीकता वाढवत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात अलबेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीला मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असल्याने तेथेच आघाडी की युती होणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला विजय मिळवून देणारी आघाडी नकोच अशा सूचना नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणूकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचं नव्हे तर शिवसेना, काँग्रेसही प्रयत्न करणार असून येणाऱ्या काही दिवसातच कोण कोणाबरोबर युती-आघाडी करतय हे पाहण औत्सुक्याच ठरणार आहे.

हे देखील वाचा

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

ITR Filing Date Extended | करदात्यांना दिलासा ! इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या शेवटची तारीख

Permanent License Exam | पुण्यामध्ये पर्मनंट लायसन्सची परीक्षा रविवारीही होणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on local body election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update