Ajit Pawar | ‘आमची मते शिवसेनेला देणार हे आधीच स्पष्ट केलेलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | राज्यसभेच्या निवडणूकीवरुन (Rajya Sabha Elections) सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना पांठिबा न देता कोल्हापूर सेना प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे राज्यातील मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येतेय. आता राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ”शिवसेना आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी सुरुवातीपासूनच पक्षात येण्यासाठी संभाजीराजेंना सूतोवाच केलं होतं. मात्र आता याबाबतीत वेगळ्या बातम्या येत आहेत. कोणी, कोणता आणि काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी संभाजीराजेंना ‘वर्षा’वर येण्याची विनंती केली होती. पण त्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. शरद पवार (Sharad Pawar) हे महाविकास आघाडीतील सर्वोच्च नेते असल्याचंही ते म्हणाले. तसेच, मागील काही दिवसांपूर्वी यासंदर्भात मी भाष्य केलं होतं. आमची मत आम्ही शिवसेनेला देणार असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. आमचा 42 मतांचा कोटा आहे. त्यांच्याकडे 27 ते 28 मत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

 

अनिल परबांवर झालेल्या ED च्या कारवाईबाबत अजित पवार म्हणाले…
”केंद्रीय यंत्रणांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर सुरू आहे. यंत्रणानी त्यांच्या अधिकारांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत आहेत.
याआधही महाविकास आघाडीतील नेत्यांवर अशा कारवाई झाल्या आहेत. माझ्याही नातेवाईकाबाबत तपास केला जात आहे.
आताही कारवाई चालू आहे. मात्र कोणत्या आधारे ही कारवाई सुरू आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही,”
असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction says clarifies to voting ncp for shiv sena rajya sabha election 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

 

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण