Ajit Pawar | शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच ! अजित पवारांकडून वकिलांसोबत झालेल्या चर्चेचा दाखला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar | उद्या 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) शिवसेनेच्या (Shivsena) 16 आमदारांची अपात्रता आणि सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांच्या व्हिपवरुन सुनावणी आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे (Shinde Fadnavis Government) आणि शिवसेनेचे पुढील राजकीय भवितव्य ठरणार आहे. शिवाय या निकालानंतरच राज्यात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येऊ शकते. दरम्यान, या संदर्भात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वकिलांचा सल्ला घेऊन केलेले एक वक्तव्य महत्वाचे आहे.

 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील संघर्षाबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, जितक्या वकिलांशी बोललो त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे तंतोतंत पालन केल्यास 16 आमदारांबाबत वेगळा निकाल लागेल, असे वाटते. शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे, असे आमचे मत आहे.

 

अजित पवार पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात प्रकरण असल्यावर दोन्ही बाजूने बोलणारे लोक असतात. काही जणांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे वाटते. मी ज्या वकिलांशी चर्चा केली त्यानुसार पक्षांतर बंदी कायद्याचे तंतोतंत पालन केल्यास 16 आमदारांच्या बाबत वेगळा निकाल लागू शकतो. मात्र, सुप्रीम कोर्ट निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. तुम्ही आम्ही निकाल असा लागला पाहिजे, तसा लागला पाहिजे असे म्हणून चालत नाही. सुप्रीम कोर्ट विचारपूर्वक निर्णय देईल. (Ajit Pawar)

अजित पवार यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी समाजाच्या संदर्भातील आरक्षण न देता या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी राजकीय आरक्षणासहीत स्थानिक स्वराज संस्था निवडणुका व्हाव्यात ही आमची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टात 12 जूनला सुनावणी आहे. इम्पिरिकल डाटाचे काम पूर्ण केले आहे. बांठिया समितीने त्यांचा अहवाल दिलेला आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर तो अहवाल बनवण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

 

ते पुढे म्हणाले, मध्य प्रदेशला ओबीसी राजकीय आरक्षण मिळते तर महाराष्ट्राला का मिळत नाही.
बांठिया समितीचा अहवाल मान्य केला जावा, अशी आमची भूमिका आहे.
ओबीसी राजकीय आरक्षण देऊनच निवडणुका व्हाव्यात. 22 तारखेपासून निवडणूक प्रक्रिया सुरु होणार आहे.
राज्य निवडणूक आयोग त्यासंदर्भातील निर्णय घेऊ शकेल, असे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar said uddhav thackeray is
chief of shivsena and gave reference of discussion with lawyers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा