Ajit Pawar | ‘अडीच वर्षात मी कधी उद्धवजींचा माईक नाही खेचला’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार परिषद सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोरील माईक स्वत:कडे खेचणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोला लगावला आहे. अडीच वर्षात आम्ही कधी माईक खेचला नाही. मी कधीच उद्धवजींसमोरचा (Uddhav Thackeray) माईक खेचून स्वत:कडे घेतला नाही. ही तर सुरुवात आहे. आत्तापासून ओढाओढी असेल तर महाराष्ट्राने हे पाहावं अशा शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत असा एक प्रकार घडला की ज्या प्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिठ्ठी देण्यात आल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका सुरु झाली. या प्रकरावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यात काही सुटत नाही, असा सूचक इशाराच त्यांनी भाजपला (BJP) दिला.

 

पेट्रोल आणि डिझेलवरील काही प्रमाणात टँक्स कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी अडीच वर्ष अर्थमंत्री (Finance Minister) राहिलोय. मागील अर्थसंकल्पात गॅसच्या किंमती (Gas Price) प्रचंड प्रमाणात कमी केल्या होत्या. साडेतेरा टक्केंचा टॅक्स तीन टक्क्यांवर आणला होता.
त्यामुळे हजार कोटींचा भार राज्य सरकारने उचलला होता. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे हे लोक मागणी करत होते
की, राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेलला जितका टॅक्स लावते, ते 50 टक्के करा.
विरोधात असताना मागणी करत होते, आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी 50 टक्के टॅक्स कमी का नाही केला?
जर 50 टक्के कर कपात केली असती तर डिझेलची किंमत 11 रुपये आणि पेट्रोल 17 रुपयांनी कमी झाली असती. मात्र त्यांनी तसे केलेच नाही.
विरोधात असताना मागणी करायची अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

अजित पवार पुढे म्हणाले, आज तीन आणि पाच रुपयांनी किंमत कमी केली आहे.
पण पुढील काही दिवसांत केंद्र सरकार (Central Government) पेट्रोल आणि डिझेल सातत्याने वाढवतेच.
गॅस सिलिंडर (Gas Cylinder) वाढवतेच. त्यामुळे सर्वसामान्यांना झळ बसत आहे.
आपण इतका टॅक्स कमी करुन देखील सीएनजीचा वापर करणारे ऑटो रिक्षावाले, टॅक्सीवाले, चारचाकी सगळे भेटतात अन् म्हणतात
की, एकीकडे तुम्ही टॅक्स कमी करता अन् दुसरीकडे केंद्र सरकार वाढवते, आम्हाला काहीच फायदा होत नाही.
पूर्वीचं बरं म्हणण्याची वेळ आली आहे,अशा प्रकारचं चित्र आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar taunt deputy cm devendra fadnavis after he snatches cm eknath shinde mic in pc

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SBI ने ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढला; कर्ज घेणे होणार महाग, नवीन आणि जुन्या ग्राहकांना फटका

 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Jayant Patil | ‘दीपक केसरकर खरे शिवसैनिक नाहीत, सिंधुदुर्गचे समुद्रकिनारे दाखवण्यासाठी..’ – जयंत पाटील