Ajit Pawar | सत्ता असो किंवा नसो ! अजित पवारांचं ‘वर्चस्व’ कायम राहणार; जाणून घ्या कसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील (Shivsena) 39 आमदारांना सोबत घेऊन ऐतिहासिक बंड पुकारल्याने राज्याच्या घडामोडीला नवं वळण आलं. कालच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) सत्तेतून पायउतार झाले. यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे गटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. दरम्यान विरोधी पक्षनेतेपदाची धुरा कोण सांभाळणार ? राष्ट्रवादी (NCP) की काँग्रेस ? (Congress) याबाबत चर्चा रंगली आहे. (Ajit Pawar)

 

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधातील सर्वात मोठा पक्ष आहे. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विधानसभेत 53 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 55 आमदार असले तरी बंडखोरीमुळे 39 आमदारांनी वेगळा मार्ग पकडला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून ते भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीच्या पदरात पडू शकतं. आणि ते अजित पवार (Ajit Pawar) असणार का त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळणारे अजित पवार यांचा संपूर्ण राज्यात दबदबा आहे. योग्य कामे आणि आपल्या कडक शब्दात चुकलेल्या अधिका-यांची खरडपट्टी काढण्यात अजित पवार पटाईत आहेत. तसेच, महाविकास आघाडी सरकार कोसळल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. दरम्यान अजित पवार मात्र विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत पाहायला मिळतील अशी चर्चा आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar will get leader of opposition in maharashtra vidhan sabha

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा