Ajit Pawar | जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांत झालेल्या दोन आरोप आणि गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. जितेंद्र आव्हाडांना मी विनंती करतो की, त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देऊ नये, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

वास्तविक त्यांनी जाहीर केले आहे की, त्यांच्यावर फार थोड्या काळात दोन गुन्हे दाखल केले गेले. या सर्व दडपशाहीला आणि हुकुमशाहीला मी कंटाळलो आहे. पोलीस दलाचा ज्या पद्धतीलने गैरवापर केला जात आहे, त्याला कंटाळून मी राजीनामा देत आहे. मी सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांना विनंती करतो की, त्यांनी अशाप्रकारे राजीनामा देऊ नये. तशा प्रकारचा विचार देखील त्यांनी मनात आणू नये. ज्या राष्ट्रवादी पक्षात ते काम करतात, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी म्हणजे शरद पवारांनी (Sharad Pawar) आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. अनेक प्रकारची स्थित्यंतरे पाहिली आहेत. कधी आपण सरकारमध्ये, तर कधी आपण विरोधी पक्षात असतो. त्यामुळे अनेक घटना घडत असतात. तो चित्रपट बंद पाडण्यासाठी जितेंद्र आव्हाड गेले असता, ज्या तरुणाला मारहाण झाली, तोच नंतर म्हणाला की, जितेंद्र आव्हाड यांनी मला वाचविले. असे असताना देखील आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना रात्रभर एका पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते, असे अजित पवार म्हणाले आहेत.

त्यामुळे आता अजित पवार यांच्या विनंतीनंतर आव्हाड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आव्हाडांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawars first reaction after jitendra awha announced his resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पोलीस गुंडानी केलेल्या कृत्याची आव्हाड माफी मागणार का? – किरीट सोमय्या

Nimrit Kaur Ahluwalia | बिग बॉस स्पर्धक निमृत कौर अहलुवालिया डिप्रेशनमध्ये, समोर आलं धक्कादायक कारण…

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल