Ajit Pawar | ‘तिकीट देण्याचा अधिकार संजय राऊतांना की उद्धव ठाकरेंना’, ‘त्या’ विधानावरुन अजित पवारांचा थेट सवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांचे सरकार असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिरुर (Shirur) मधील पुढील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) असतील असे वक्तव्य केले होते. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देताना थेट सवाल केला आहे. मी उमेदवार जाहीर केल्यानंतर तिकीट देण्याचा अधिकार मला आहे की शरद पवारांना (Sharad Pawar) ? संजय राऊतांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray), असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, संजय राऊत यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी ते वक्तव्य केलं असावं. उद्या मी पण जिथं शिवसेनेचा खासदार आहे तिथ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून उमेदवार जाहीर करेल, पण उमेदवार जाहीर केल्यावर मला तिकीट देण्याचा अधिकार आहे की शरद पवारांना ? सजंय राऊत यांना तिकीट देण्याचा अधिकार आहे की उद्धव ठाकरे यांना आहे ? असा सवाल उपस्थित केला.

काय म्हणाले होते राऊत ?
शिरुरचे माजी खासदार आढळराव पाटील हे पुन्हा संसदेमध्ये (Parliament) दिसतील. लोकसभेत आम्ही दोघं एकत्र बसणार आहोत, असे विधान संजय राऊत यांनी खेडमधील आंबेगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले होते. विशेष म्हणजे सध्या शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे खासदार आहेत. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असताना, संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader and dcm ajit pawar comment on sanjay raut statement about shirur loksabha constituency candidature

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा