Ajit Pawar | मनसेला राष्ट्रवादीची फूस आहे का ?; अजित पवार यांनी स्पष्टंच सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फूस देत आहे का ? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘मनसेला राष्ट्रवादी काँग्रेस फूस देत असती तर राज ठाकरे यांनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका केली नसती,’ असं अजित पवार यांनी सांगतिलं आहे.

 

मुंबईत माध्यामांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ”राज ठाकरे यांचा सध्याचा अंजेडा ठरलेला आहे. ते भाजपवर टीका करत नाहीत. त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनच पक्ष आहेत.” असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

पुढे अजित पवार म्हणाले, ”मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका केली असती का, हा साधा विचार करा.
राज ठाकरे हे सध्या भाजपवर (BJP) टीका करत नाहीत. राज ठाकरे यांचा सध्याचा अजेंडा ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी भाजपला टार्गेट केले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली नव्हती. एवढेच नव्हे तर त्यांनी अनेक ठिकाणी अप्रत्यक्षपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचारच केला होता.
मात्र, आता ते महाविकास आघाडीच्या विरोधात स्पष्टपणे बोलत असल्याचे,” ते म्हणाले.

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार (BJP leader Ashish Shelar) यांनी केलेल्या आरेोपावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
2017 सालीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता.
त्यावर अजित पवार म्हणाले की, ‘मग ही गोष्ट 2017 सालीच सांगायची होती ना.
तुम्ही 5 वर्षे कशासाठी थांबलात ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader and dcm ajit pawar reaction on is theres is hidden alliance between raj thackeray mns and ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा