Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या (Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal) माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे (Corporations Funds) तातडीने वितरण करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे (Corporations Funds) तातडीने वितरण करण्याचे निर्देश (Instructions) त्यांनी दिले आहे.

राज्यातील सर्व समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी
राज्य सरकारच्यावतीने विविध प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाद्वारे योजना राबविण्यात येतात.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाद्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय,
विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणुकी बरोबरच लघू उद्योग, वाहतूक,
अन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील अधिकाधिक तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा. असं सांगण्यात आलंय.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader and deputy chief minister ajit pawars directive immediately to distribute the sanctioned funds of all the corporations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी