Ajit Pawar | ‘राज्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोरोना (Corona Virus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन व्हेरिएंटने (Omicron Covid Variant) राज्याला चिंता लागली आहे. सध्या कोरोनाचे हळूहळू रुग्ण देखील वाढत असल्याचे दिसत आहे. यातच ओमिक्राॅनचे रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील निर्बंधाबाबत महत्वाची माहिती दिली आहे. ‘राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील,’ असं म्हणत राज्यात पुन्हा एकदा निर्बंधांचे (Restrictions) संकेत दिलेत.

 

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.
लोकांनी काळजी न घेतल्यास पुढच्या दीड-दोन महिन्यांमध्ये संसर्ग वाढण्याची भीती आहे.
त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या-त्या वेळी रुग्णसंख्येचा आकडा पाहून कठोर निर्णय घ्यावे लागतील.
त्याबाबतचे निर्णय मुख्यमंत्री घेतील,’ असं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध (Restrictions) लागू होणार का यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.
यामुळे अजित पवार यांनी निर्बंधाबाबत माहिती दिली.
दरम्यान, तत्पुर्वी काही दिवसापुर्वी राज्यात रात्रीची जमावबंदी राज्य सरकारने (Maharashtra Government) लागू केली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader and deputy cm ajit pawar talks about increased corona patients and restrictions may imposed state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

New Year 2022 | नवीन वर्षात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपले आर्थिक नियोजन कसे करावे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Corona in Maharashtra | ‘मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाबाबत 2 दिवसांत निर्णय होणार’ – आदित्य ठाकरे

Mukesh Ambani Reliance | मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे उद्योग जगताचे लक्ष