Ajit Pawar | ‘राष्ट्रवादीच्या मंत्र्याने NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली’, अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात 100 कोटी लसीकरण (Vaccination) झाले असून त्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. पुण्यात (Pune) अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिवाळीचे मोठे गिफ्ट (Diwali Gift) दिले आहे. पुणेकरांची दिवाळी पहाट कार्यक्रमाची मागणी मान्य करुन दिवाळी गिफ्ट दिलं. पुण्यात 1 कोटी 17 लाख जणांचे लसीकरण झाल्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, दिवाळीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन 100 टक्के क्षमतेने थिएटर्स सुरु करण्याचा विचार आहे. तसेच मागील 9 दिवसांमध्ये लसीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षावरील नागरिकांमध्ये कोरोनाची (Corona) लागण होत असल्याचे आढळून आले आहे. पुण्यातील मेट्रोबाबत (Pune Metro) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ (Nagpur pattern) राबवला जाणार आहे. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

मलिकांच्या प्रकरणावर ‘नो कमेंट’

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.
त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले.
यावर आज अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले.
‘नो कमेंट’, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Ajit Pawar | ‘NCP minister criticizes NCB officer Sameer Wankhede in one language’, Ajit Pawar said …

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update