Ajit Pawar NCP On Anna Hazare | अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कोणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचा पलटवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar NCP On Anna Hazare | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात (Shikhar Bank Scam Case) मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai EoW) अजित पवारांना क्लिनचीट दिली. आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट कोर्टात सादर केलेला आहे. त्यावरच आता अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला आहे.(Ajit Pawar NCP On Anna Hazare)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेल्या पुरवणी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयाने आक्षेप मान्य केला असून, याचिका दाखल करण्यास वेळ दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जून रोजी होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी अण्णा हजारे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत टीका केली आहे.

“अनेक यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी झाल्यानंतर त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही. मग त्यावरती क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. न्यायालयीन प्रक्रिया असो की चौकशीची प्रक्रिया असो, त्या दोन्ही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या होत्या.
त्यानंतर तो क्लोझर रिपोर्ट केला होता.

बारा महिने कुंभकर्णासारखं झोपणारे अचानकपणे जागृत होऊन अशी मागणी करतात.
मला वाटतं या स्वयंघोषित समाजसेवकाचा बोलवता धनी कोणीतरी दुसराच आहे, यांची नार्को टेस्ट आधी झाली पाहिजे,
अशी मागणीही राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली.

“तुमचा महाराष्ट्रातील यंत्रणेवर विश्वास नाही, तुमचा महाराष्ट्रातील न्यायपालिकेवर विश्वास नाही.
मग अचानक तुम्ही बारा महिन्यानंतर एखाद्या दिवशी उठता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करता.
तुमची गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली राष्ट्रवादी विरोधातील मोहिम नेमकी कुणाच्या इशाऱ्यावर चालते? हे सुद्धा
पाहावं लागेल यासाठी अण्णा हजारेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असंही सुरज चव्हाण म्हणाले.
राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, मग ते मित्र आहेत, शत्रू आहे, नेमकं या प्रेमाची
भेट अण्णा हजारेंना कुणी दिली हे पाहावं लागेल, असंही चव्हाण यांनी म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे फडणवीस का नव्हते? अजित पवार म्हणाले…

Indapur Pune News | देशात उंच घोड्यामध्ये नावलौकिक असलेल्या ‘सिंकदर’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Excise Department Pune | पुणे : पोर्शे कार अपघातानंतर उत्पादन शुल्क विभागाला आली जाग, 68 हॉटेल व पबचे परवाने रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव