Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन (National Convention) पार पडले. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) हे दोनवेळा व्यासपीठ सोडून निघून गेले. त्यांच्या या तडकाफडकी स्वभावामुळे ते पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? अशी सुरु झाली. यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे. मी नाराज नाही, असं म्हणत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेत्यांनी मार्गदर्शन केले. मी राष्ट्रीय पातळीवर जास्त बोलत नाही, असं सांगत त्यांनी नाराजीच्या वृत्तांवर खुलासा केला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद (Deputy CM) दिले, विरोधी पक्षनेतेपद (Opposition Leader) दिले. मी नाराज कशाला होऊ? राष्ट्रवादीने मला कधी डावललं नाही. मला अधिवेशनात कुणी बोला अथवा नका बोलू असं सांगितलं नव्हतं. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. वस्तूस्थिती आधारित बातमी देण्याची जबाबदारी माध्यमांसमोर आहे मी 21 वर्षात राष्ट्रीय पातळीवर जातो परंतु कुठे भाष्य करत नाही. राज्यात अधिवेशन असलं, कार्यक्रम असलं तर मी भाषण करतो. तुमचे गैरसमज दूर करुन राज्यासमोरील प्रश्नाबाबत भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी म्हटले.

लम्पी आजारामुळे शेतकरी त्रस्त

लम्पी आजारामुळे (Lumpy Disease) शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून त्यामुळे दूध व्यवसायावर परिणाम झाला आहे. हा आजार झालेल्या प्राण्यांचे दुधही शरीरासाठी घातक आहे.
त्यामुळे येत्या हंगामातील साखर कारखाने सुरु होण्यापूर्वी लम्पी आजारावर आळा घालणे गरजेचं आहे.
अशा प्राण्यांना विमा संरक्षण (Insurance Coverage) देण्यासाठीही उपाययोजना सरकारने कराव्यात.
यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

गर्दी जमवावी लागणं हे दुर्दैव

औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी करण्यासाठी पर्यवेक्षिका (Supervisor), अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika) यांना हजर राहण्याबाबत पत्रक काढून आदेश देण्यात आले.
महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडतंय. अंगणवाडी सेविकांना सभेला बोलावलं तर मुलांकडे लक्ष कोण देणार?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांला गर्दी जमवण्यासाठी अशाप्रकारे आदेश काढले जात असतील तर हे दुर्दैव आहे.
आता सत्ताधारी म्हणतील परस्पर हे पत्रक काढलं गेले.
मात्र आम्हीही सरकारमध्ये होतो असं परस्पर कुणी पत्रक काढत नाही असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे (CM Eknath Shinde) यांना लगावला.

Web Title :- Ajit Pawar | NCP senior leader ajit pawar upset with ncp a big revelation was made in the press conference

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cabinet Meeting Decision | 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ‘सेवा पंधरावडा” म्हणून साजरा होणार, मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय (व्हिडिओ)

Gold-Silver Rate | पितृपक्षामुळे देशभरात व्यवसायात 10 टक्के घट, सोने-चांदीत सर्वात जास्त घसरण