Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांना धक्का, माढ्याचे आमदार शिंदेनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ

Sharad Pawar Vs Ajit Pawar | After Jansanman Yatra, Sharad Pawar Group's Swabhiman Yatra in Baramati; Challenge to Ajit Pawar
ADV

माढा : Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी महायुती (Mahayuti) आणि मविआ (Mahavikas Aghadi) कडून सुरु झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका पुन्हा विधानसभेला बसू नये म्हणून महायुतीने मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे मविआ ने रणनीती आखत भेटीगाठी-मेळावे सुरु केलेले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणूका तोंडावर असताना अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे (Madha Assembly Constituency) आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) हे मोदीबाग याठिकाणी शरद पवारांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाचे आणखी एक आमदार शरद पवार गटात प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आमदार बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार गटाकडून धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे हे इच्छुक आहेत. तसेच अभिजित पाटील यांच्यासह मिनल साठे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. मात्र, अशातच आता बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने आगामी काळात काय होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे माढा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर त्यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू धनराज शिंदे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती.

तर आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी रोहित पवार यांचे वडिल राजेद्र पवार यांची भेट घेतली होती.
त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु होती.
दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची तुतारी कोणाला मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray On Amit Shah | ‘अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शाह’ उद्धव ठाकरेंची जहरी टीका; म्हणाले – “ढेकणं चिरडायची असतात…”

Vijay Kedia | दिग्गज गुंतवणुकदाराचे गाणे गाऊन अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना साकडे, व्हिडिओ जबरदस्त व्हायरल, यूजर्सच्या प्रतिक्रिया लक्षवेधक

Total
0
Shares
Related Posts