145 चा आकडा जुळल्याशिवाय ‘गोड’ बातमी नाही : अजित पवार

नीरा : पोलिसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाआघाडीला बहुमत मिळाले नाही. ते महायुतीला बहुमत मिळालेले असून त्यांच्या मध्ये वाद चालल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. १४५ आमदारांचा मँजिक आकडा गाठायचा आहे. त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्न करीत आहे. मात्र जो पर्यंत १४५ च्या पुढे आकडा जात नाही, तो पर्यंत गोड बातमी येणार नाही असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट करीत सत्तास्थापनेबाबत सावध पवित्रा घेतला.

सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सह. कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले कि, राज्यात सत्ता स्थापनेबाबत वेळेमध्ये मार्ग निघाला नसल्याने राष्ट्रपती राजवट लागली असून काही झाले तरी मतदारांंकडे मत मागायला येणार नाही. मात्र सत्ता स्थापनेसाठी दोन किवा तीन पक्षांनी एकत्र आल्याशिवाय सरकार बनू शकणार नाही. नेहमी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सातारा जिल्हा कौल देण्याबाबतीत पुढे असतो परंतु या वेळी दौन्डची जागा वगळता पुणे जिल्ह्याने ग्रामीण भागात महाआघाडीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून देण्याचे काम जनतेने केले याबाबत समाधान व्यक्त केले. बारामतीकरांच्या मेहनतीने सत्तेची दारे उघडले गेलेली आहेत. त्याबाबतीत जुळवून घेता येईल का याबाबत प्रयत्न करीत आहे. जनतेने कौल दिलेला असल्याने आमची जबाबदारी वाढलेली आहे. मात्र सत्ता स्थापनेबाबत अजित पवार यांनी सावध पवित्रा घेत कोणतेही भाष्य केले नाही

दिल्ली, मुंबई मध्ये बारामती मतदारसंघाची चर्चा…
विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे सर्व विरोधी उमेदवारांचे डिपाझिट जप्त करून १ लाख ६५ हजारापेक्षा अधिक मताधक्याने विजयी झाल्याच्या बातम्या दिल्ली, मुंबई येथील विविध दैनिकांत झळकल्याने तेथील नागरिकामध्ये असं कसं घडू शकत कि सर्वच विरोधी उमेदवारांचे डिपाझिट जप्त होतात याची जोरदार चर्चा झाली त्यावेळी अजित पवार यांनी सांगितले कि हे सर्व बारामतीचे मतदारच करू शकतात .

पुरंदरचे तत्कालीन आमदार विजय शिवतारे हे नेहमीच जेष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्या वर घसरायचे. मात्र ते काय मागे पडायला तयार नव्हते, मग त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत आव्हान दिले होते कि ‘ आता आमदार कसा होता तेच पाहतो’ हे पुरंदरकरांनी ऐकले आणि संजय जगताप भरघोस मतांंनी निवडून दिले. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये याची काळजी घेतली होती. त्यामुळे भोरमध्येही याचा फायदा झाला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पवार साहेबां मुळेच राष्ट्रवादीला यश ……
शरद पवार यांना काढलेली ई.डी.ची नोटीस, सातारा मधील शरद पवारांची पावसात झालेली सभा व राज्यातील शेतकर्यासाठी साहेब जी मेहनत घेत होते. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या टीकेने राज्यातील जनतेची मने दुखाावलेली होती त्यामुळे राष्ट्रवादीला यश मिळाले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

Visit : Policenama.com