Ajit Pawar | ‘लस नाही तर प्रवेश नाही’, अजित पवारांचा पुण्यात मोठा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील शासकीय (Government), निमशासकीय (Semi-Government), खाजगी (Private)अशा सर्व आस्थापनांमध्ये कोरोना लशीचे दोन डोस (Vaccine) न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. विधान भवन येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी या मोठ्या निर्णयाची घोषणा केली.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण (Vaccination) वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन डोस नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात येत आहे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन डोस शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये असे निर्देश पवार यांनी दिले.

 

या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne), जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे (Nirmala Pansare), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol), खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), वंदना चव्हाण (Vandana Chavan), विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) आदी उपस्थित होते.

 

Web Title :- Ajit Pawar | ‘No vaccine, no admission’, Ajit Pawar’s big decision in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात 18,466 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवुन 40 लाखाची फसवणुक; पुणे पोलिसांकडून दांपत्यास अटक

Shani Gochar 2022 | शनि साडेसातीचा काळ सुरू होतोय; ‘या’ राशीच्या लोकांना व्हावं लागेल अलर्ट

Ajit Pawar | महाराष्ट्र खंबीर ! उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘2 वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार’

Ajit Pawar | विना मास्क 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास थेट 1000 रुपये दंड आकारण्याचे अजित पवारांचे निर्देश

PNB Job | पंजाब नॅशनल बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! ‘या’ पद्धतीने होणार निवड; जाणून घ्या सविस्तर