अजितदादांची ‘फटकेबाजी’, ‘विकेट’ मात्र सीनिअर अन् ज्युनिअर ठाकरेंची ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. सरकार स्थापन होत असताना उपमुख्यमंत्रीपद कोणाला यावर जोरदार वादंग उठला होता. एकीकडे शांत, नेमस्त उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे बेधडक अजित पवार यांचे जुळणार की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्याची उत्तर आता मिळू लागली आहेत. मागील आठवड्यात अजित पवार यांनी एकाच वाक्यात ठाकरे पिता पुत्रांची, म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंची विकेट काढली. यावरुनच अंदाज आला की काकांनी पुतण्याला उपमुख्यमंत्रीपदाचा हार का घातला.

अजित पवारांनी पदभार स्वीकारला आणि स्वाभावानुसार कामाचा धडाका लावला. विविध विषयावर त्यांनी सरकारची भूमिका मांडली आहे. मग ती इंदु मिल संबंधित असेल किंवा पुण्यातील मेट्रो प्रकल्पाबाबत, बारामतीतील गॅस पुरवठा असो वा साई बाबांच्या जन्मस्थळावरुन पेटलेल्या वादावर. अजित पवार कशाबद्दल काय म्हणताय, ते कोणता धडाकेबाज निर्णय घेताय यावर सर्वांचे लक्ष लागून असते. संजय राऊतांनी त्यांचा उल्लेख गमतीने स्टेपनी असा केला होता. परंतु अजित पवारांची पॉवर आणि प्रशासनावरील पकड पाहून सध्यातरी हेच चित्र आहेत की राज्याचं स्टेरिंग तेच घेऊन बसले आहेत. यावर उद्धव ठाकरे देखील म्हणाले होते की आमच्या सरकारचे ड्रायव्हिंग अजितदादांकडेच आहे. त्यांचा बोलण्याचा सूर थोडा मिश्किल होता परंतु दादांची गाडी मात्र फुल स्पीडमध्ये आहे.

परंतु यामुळे वरिष्ठ आणि कनिष्ठ ठाकरेंसाठी हा स्पीडब्रेकर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंची श्वेतपत्रिका आणि आदित्य ठाकरेंच्या नाईटलाईफबद्दल अजित पवारांची मतं वेगळी असल्याचे संकेत नुकतेच मिळले.

उद्धव ठाकरेंनीन श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा झाली होती. जयंत पाटलांनी देखील श्वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीर केले होते, त्यांनी दावा केला की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आर्थिक शिस्त बिघडली. आता जे काही असेल ते श्वेतपत्रिकेत येईलच असे उद्धव ठाकरे म्हणाले. परंतु अर्थमंत्री अजित पवार यांनी श्वेतपत्रिकेचा विषय गुंडाळल्याचे दिसते आहे. आपल्या पुढे इतरही महत्वाचे विषय असल्याची भूमिका अजित पवारांनी घेतली.

नाइट लाईफवर अजित पवारांनी प्रश्न विचारण्यात आला होती की मुंबईप्रमाणे पुण्यात देखील नाइट लाइफला परवानगी देणार का. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की सध्या या प्रस्तावापेक्षा आमच्याकडे इतर महत्वाची कामे आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख देखील मुंबईतील नाइट लाईफच्या अंमलबजावणीवर फारसे सकारात्मक दिसत नाहीत. पोलिसांवर येणारा तणाव आणि मनुष्यबळाचा मुद्दा उपस्थित करुन त्यांनी हा विषय टाळला. आदित्य ठाकरेंच्या फोननंतर त्यांची भूमिका मवाळ झाल्याचे समजते आहे.

खातेवाटपापासून चर्चा आहे की महत्वाची खाती स्वत:कडे ठेवून राष्ट्रवादी ठाकरे सरकारवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. अजित पवारांनी कामाचा धडाका लावला आहे. त्यांची फाईल हँडेल करण्याची पद्धत पाहता ठाकरेंना त्यांना हँडेल करणं सोपं नाही.

महाविकासआघाडीमध्ये ताळमेळ आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. शिवसेना-काँग्रेसमध्ये देखील इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्याभेटीवरुन नाराजींचे सूर आवळताना दिसले. तर बाळासाहेब थोरातांनी तर स्पष्ट केले की भविष्यात असे सहन करणार नाही. वीर सावरकरांबद्दलचे राऊतांचे विधान काँग्रेसला रुचले नाही. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केले की शिवसेनेनं 2014 सालीच काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विधानाने शिवसेना पेचात सापडली. असे असले तरी राष्ट्रवादी अजून तरी या वादांपासून दूर असल्याचे चित्र आहे.

फेसबुक पेज लाईक करा –