Ajit Pawar On Ashish Shelar | ‘भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी’च्या ‘त्या’ सरकारवर अजित पवारांनी केलं भाष्य, म्हणाले – ‘शेलार 5 वर्षे कशाला थांबले ?’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Ashish Shelar | राज्यात राष्ट्रवादी (NCP) आणि भाजप (BJP) सरकार स्थापन करावं असं वाटलं होतं त्यानुसार पालकमंत्रीही ठरले. मात्र शिवसेनेसोबत (Shivsena) आमचं जमणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीने नकार दिल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी केला होता. अशातच यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया देत शेलारांवर निशाणा साधला आहे. (Ajit Pawar On Ashish Shelar)

 

हे सगळं आशिष शेलार आता का सांगत आहेत ?, त्यांनी हे आधीच सांगायचं ना, पाच वर्षांनंतर अचानक शेलारांना का आठवलं आणि इतकी वर्ष का थांबले होते ?, पाच वर्षांआधी काहीतरी घडल्याचा दावा ते करत आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये फरक असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

तेव्हा अनेक नेते इकडे तिकडे येत होते आणि त्यांची विधानेही वेगवेगळी होती. सध्या राज्यासमोर वेगळे प्रश्न आहेत आपण त्यावर बोलू, असं पवार म्हणाले. पुण्यामध्ये (Pune) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

आशिष शेलार काय म्हणाले ?
2017 मध्येच राष्ट्रवादीसोबत युती (Alliance) करावी असं भाजपला वाटलं होतं. शिवसेनेने खिशामध्ये राजीनामे आणि तोंडात जहर अशी भूमिका घेतली होती त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप सरकार स्थापन करावं असं वाटलं होतं त्यानुसार पालकमंत्रीही ठरले मात्र पुन्हा भाजपच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की आपण तीन पक्षांचं सरकार स्थापन करु.

 

तीन पक्षांचं सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीने नकार दिला होता.
आमचं शिवसेनेसोबत जमणारच नसल्याची राष्ट्रवादीने भूमिका घेतली.
त्यावेळी भाजपने शिवसेनेला सोडायला नकार दिला होता.
मात्र 2019 मध्ये शिवसेनेने भाजपला सोडण्याची भूमिका सहजपणे घेतल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षाची भूमिका किती महिन्यांमध्ये बदलते याचा साक्षीदार भाजप असल्याचं म्हणत शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधला होता.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Ashish Shelar | why bjp mla ashish shelar was silent for 5 years questions ncp leader ajit pawar on bjp ncp shiv sena government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा