Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Baramati Lok Sabha | जोपर्यंत सामान्य माणूस, मतदार माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत राजकीय कारकीर्द धोक्यात येऊ शकत नाही. मी काम करणारा माणूस आहे. मी काम करतो हे लोकांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे, हे देखील लोकांना माहिती आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास अजित पवारांचे करिअर धोक्यात येईल का? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.(Ajit Pawar On Baramati Lok Sabha)

अजित पवार पुढे म्हणाले, मी जी गोष्ट हातात घेतो तडीस नेतो, आजपर्यंत मी कोणाचे नुकसान केले नाही हे लोकांना माहिती आहे. माझे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल करत असतो. त्यामुळे माझ्यासोबत जोपर्यंत जनता आहे तोपर्यंत माझ्या कारकीर्दीला कोणताही धोका नाही.

सुनेत्रा पवारांच्या (Sunetra Pawar) उमेदवारीवर अजित पवार म्हणाले, बारामतीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत असताना अनेक नावे पुढे आली. सुनेत्रा पवारांना चांगला अनुभव आहे त्यांनी अनेक समाजकार्य केली आहेत. गावकऱ्यांसोबत चांगले ट्युनिंग आहे.

अजित पवार म्हणाले, बारामतीच्या विकासासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून अधिक जलद गतीने होईल.
केंद्रात जाणारा खासदार हा सत्ताधारी विचारांचा गेला तर कामे जास्त करता येतात मतदारसंघातला विकास वेगाने होतात.
केंद्रातून रेल्वे, रोड यांच्यासाठी लागणारा निधी व्यवस्थित येतो. सत्ताधारी पक्षाचा उमेदवार जिंकला तर काम जास्त होतात.
विविध कर्ज पाहिजे असतील तर केंद्रामार्फत जावे लागते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : प्रेमसंबंधातून महिलेचा खून, आरोपीला काही तासात गुन्हे शाखेकडून अटक (Video)

Health Insurance | मोठा निर्णय! आता हेल्थ इन्श्युरन्ससाठी नाही वयाचे बंधन, आजारी व्यक्तीही घेऊ शकतात विमा, 65 वर्षांची वयोमर्यादा हटवली