शिवसेना-भाजपचं काय चाललंय हे समजत नाही, अजित पवारांचा विनोद तावडेंना ‘टोला’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात ओला दुष्काळ असताना, शेतकऱ्याची परिस्थिती बिकट असताना अद्याप शिवसेना-भाजपने सरकार स्थापन केले नाही. जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले असताना त्यांच्यात वाद सुरु आहेत. त्यांच्यामध्ये नेमके काय चालले आहे हेच समजेनासे झालेय, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. आज सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतेली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार बोलत होते.

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याच्या काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांसाठी तातडीची 10 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली मदत ही तोकडी असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यामध्ये राज्यपालांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सांगली, कोल्हापूर पूरग्रस्तांना अद्याप मदत नाही
सांगील, कोल्हापूरमध्ये महाभंयकर पूर आला होता. सरकारने त्यावेळी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली होती. मात्र, अद्याप पूरग्रस्तांना मदत मिळालेली नाही. परतीच्या पावसाने राज्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, तूर, कापूस, द्राक्ष या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विनोद तावडेंना टोला
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या अगोदर विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावर बोलताना त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत माझे तिकीट का कापले हे विचारण्यासाठी तावडे आले असतील असा टोला लगावला. तसेच ज्याला मत देण्याचा अधिकार नाही त्याने राज्यपालांची भेट घेण्याचे कारण काय. राज्यपालांची भेटच घ्यायची होती तर प्रमुख नेत्यांनी भेट घेयला पाहिजे होती असे ही अजित पवार म्हणाले.

सेल्फ अ‍ॅड्व्हान्स घ्या
राज्यामध्ये ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकरी राहिला नाही तर हे शासन देखील राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या. वेळ पडल्यास सेल्फ अ‍ॅडव्हान्स काढा आणि शेतकऱ्यांना मदत करा. केंद्राची मदत आली नाही, विम्याचे पैसे आले नाही अशी कारणे न देता या काळजीवाहू सरकाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. तसेच पावसाळा सुरु झाल्यापासून मच्छिमारांना समुद्रात जाता येत नाही. त्यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यांना देखील नुकसान भरपाई दिली जावी असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Visit : Policenama.com

नकारात्मक विचारांमुळे वाढू शकतो चिडचिडेपणा, ‘या’ 8 गोष्टींची काळजी घ्या
सर्वात फिट अ‍ॅक्टर अक्षय कुमार कोणता व्यायाम करतो ? जाणून घ्या
स्नायूंच्या दुखण्यांपासून दूर राहण्याचे ‘हे’ 4 सोपे मार्ग, जाणून घ्या
सावधान ! वर्कआउटनंतर कधीही करु नका ‘या’ 4 गोष्टी, जाणून घ्या
हातांचे सौंदर्य वाढवतात नखे, त्यांची काळजी ‘या’ 5 प्रकारे घ्या
तारूण्यातच द्या आरोग्याकडे लक्ष…अन्यथा मध्यमव्यासह म्हातारपणी होईल त्रास