Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule | ‘ज्या माणसाला स्वत:चा पक्ष उमेदवारी देत नाही, त्याने काय गप्पा माराव्यात’, अजित पवार यांचा बावनकुळेंना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule | नुसत्या गप्पा मारायचं काम करतात, ज्या माणसाला स्वत:चा पक्ष उमेदवारी देत नाही, पत्नीला दिलेली उमेदवारी पण पुन्हा काढून घेतली जाते यांची विश्वासहर्ता यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या, मी खंबीर आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना टोला लगावला. पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबई महापालिका निवडणुक (Brihanmumbai Municipal Corporation Election), दसरा मेळावा (Dussehra Melava) यावर भाष्य करताना राज्य सरकारवर निशाणा साधला. (Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule)

भाजपने आता पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीकडे (Baramati Constituency) मोर्चा वळवला आहे. येणाऱ्या निवडणुकीत एक लाख मतांनी भाजपचा उमेदवार बारामतीतून निवडून येईल, असा दावा बावनकुळे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देताना बावनकुळेंना टोला लगावला. (Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule)

महाराष्ट्रात अजून कुठे मला आणि माझ्या बहिणीला मतदारसंघ मिळतोय का बघतो, कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल, मी त्यांनाच विचारणार आहे की असा कोणता मतदारसंघ ठेवणार आहे का जिथे आम्ही निवडुन येऊ शकतो, असे म्हणत अजित पवारांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.

शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) निशाणा साधताना अजित पवार म्हणाले,
अजूनही सरकार स्थिरस्थावर नाही, कोर्ट अजूनही तारीख पे तारीख देत आहे. त्यामुळे त्यांना अजूनही कळत नाही की
सुप्रीम कोर्ट (Supreme Court) काय निकाल देईल, यांनी कितीही आव आणला तरी त्यांच्यावर टांगती तलवार
असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच भाजपला महागाईवर बोलता येत नाही, शेतकऱ्यांना मदत करत नाही,
भाजप लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करतात, अशी टीका त्यांनी केली.

दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना अजित पवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची
बाजू घेतली. ते म्हणाले, न्यायालय याबाबत निर्णय घेईल, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी
शिवाजी पार्क (Shivaji Park) वरील दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती आणि त्याच मैदानावरुन सांगितले
होते की इथून पुढे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे जबाबदारी निभावतील.

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना पवार म्हणाले, आता निवडणुका घेण्यास हरकत नाही.
ज्या प्रमाणे ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तशाच इतर निवडणुका जाहीर व्हायला हव्या.
आम्ही शिवसेनेबरोबर मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवाव्यात या मताचा मी आहे.
परंतु काँग्रेसचा (Congress) निर्णय काँग्रेस घेईल, असेही अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar On Chandrashekhar Bawankule | he not given a ticket by the party he talk about baramati ajit pawar on chandrashekhar bawankule

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weight Loss by Walking | चालता-चालता कमी करू शकता आपले वाढलेले वजन, केवळ ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा

Brahmastra Movie Review | ‘ब्रह्मास्त्र’ प्राचीन भारतीय इतिहासाचा आधार घेऊन केलेला एक मोठा प्रयोग, 8 वर्षांची मेहनत, 400 कोटींचे बजेट