×
HomeUncategorizedAjit Pawar On CM Eknath Shinde Group | 'कामाख्या देवीला रेड्यांचा बळी...

Ajit Pawar On CM Eknath Shinde Group | ‘कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जाताहेत? – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार असल्याची राज्यात चर्चा आहे. त्यावरुन विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar On CM Eknath Shinde Group) यांनी देखील एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. शिंदे नेमका कुणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत, असे अजित पवार (Ajit Pawar On CM Eknath Shinde Group) म्हणाले.

 

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिंदे गटाने गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरात नवस केला होता. ते तो नवस पूर्ण करण्यासाठी जात आहेत. कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते नेमका कोणाचा बळी देण्यासाठी गुवाहाटीला जात आहेत, असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. शिंदे गटाचे मंत्री, खासदार आणि आमदार पुन्हा एकदा गुहाटीला जाणार असल्याची माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली होती.
तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा नवस कामाख्या देवीला केला होता,
तो फेडण्यासाठी जात आहोत, असे सांगितले आहे.

 

त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे. काही ठिकाणी बोकडांचा बळी दिला जातो.
काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी दिला जातो. मला कळाले आहे, की तिथे रेड्यांचा बळी दिला जातो.
आता कोणाचा बळी देण्यासाठी ते तिथे चालले आहेत, आपण बघूया, असे अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- cm eknath shinde group faction to visit guwahati again ajit pawar reaction

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Yoga Guru Ramdev Baba | रामदेव बाबांचे विधान, म्हणाले – महिला साडी-सलवारमध्ये छान दिसतात, काही नाही घातलं तरी छान दिसतात

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News