Ajit Pawar On CNG | सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी खुशखबर ! महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून CNG स्वस्त

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ajit Pawar On CNG | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar On CNG) यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे संकुचित नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजी (CNG) इंधनावरील मुल्यवर्धित कराचा (VAT) दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल (शुक्रवारी) केली. याबाबत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अधिसुचना जाहीर केली गेली. यामुळे महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार असल्याने सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी ही एक खूशखबर आहे. (CNG Will Be Cheaper In Maharashtra From April 1)

अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (VAT) 13.5 टक्क्यांवरुन तीन टक्के करण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar On CNG) यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. त्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. सीएनजीचे दर कमी झाल्याने आता अशा वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला देखील अटकाव बसू शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे.

कोणाला मिळाणार फायदा ?

– ऑटो रिक्षा
– टॅक्सी चालक
– प्रवासी वाहतूक करणारी वाहने
– नागरिक

Web Title :- Ajit Pawar On CNG | Good News ! cng will be cheaper in maharashtra from april 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा