Ajit Pawar On Dhananjay Munde Health | ‘धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका नाहीच त्यांना..’; अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Dhananjay Munde Health | ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना रात्री ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा झटका आला नसल्याचं सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यावर माध्यमांशी बोलताना पवारांनी माहिती दिली. (Ajit Pawar On Dhananjay Munde Health)

 

धनंजय मुंडे यांना सौम्य झटका आल्याची बातमी पसरली मात्र झटका वगरे काही आला नाही. डॉक्टर तपासणी करत असून त्यांना विश्रांती घेण्यास सांगितली आहे. मंगळवारी पक्ष कार्यालयात आणि पवारांकडे जात असताना त्यांना भोवळ आल्यासारखं झालं आणि ते बेशुद्ध  झाले. त्यांना इथे आणल्यावरही शुद्ध आली नव्हती असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँन्डी रूग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी धनंजय मुंडे यांना सात दिवस विश्रांती घ्यायला सांगितली आहे. रूग्णालयात त्यांना भेटण्यासाठी पक्षातील नेते जात आहेत त्यासोबतच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनीही धनंजय मुंडेंची भेट घेतली.
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीही माहिती दिली.

 

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धंनजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कोणतेही कारण नाही.
कामाचा ताण व प्रवास इत्यादीमुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते.
काल रात्री उशिरा मी त्यांची भेट घेऊन डॉक्टरांशी देखील सविस्तर चर्चा केली असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

 

Web Title :- Ajit Pawar On Dhananjay Munde Health | ncp ajit pawar denied reports of dhananjay munde admitted because of heart atatck

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा