…तर एकनाथ खडसेंचं स्वागतच करू : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ गडावर हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित एकनाथ खडसेंनी आपली पक्षावरील नाराजी व्यक्त केली. राज्यातील पक्ष नेतृत्वाला घेरण्याचा प्रयत्न खडसेंकडून करण्यात आला. यावेळी ते म्हणाले की ज्यांना आम्ही मोठं केलं ते आम्हाला विसरले. एवढ्यावर ते थांबले नाहीत. ते म्हणाले की पंकजाताई भाजपात आहेत पण माझा काही भरोवसा नाही. यावर जेव्हा अजित पवारांना प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केले.

अजित पवार म्हणाले की एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर राष्ट्रवादीत त्यांचं स्वागत करु. पंकजा मुंडे यांची नाराजी हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे असेही अजित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस अजित पवारांना ‘बंडाचे नायक’ असे म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवारांनी नो कमेंट्स म्हणत उत्तर देणं टाळलं. भाजपने शिवसेनेला ऑफर देऊ दे की काहीही हरकत नाही तो त्यांच्या प्रश्न आहे. सध्या शिवसेना आमच्यासोबत आहे एवढंच मी सांगितले असे ही अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्रिपदावर बोलताना अजित पवार म्हणाले की, या बाबत जो काही योग्य निर्णय असेल तो शरद पवार घेतील.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like