Ajit Pawar On Girish Mahajan | ‘देवेंद्र फडणवीस CM न झाल्याने गिरीश महाजन तर अजूनही फेट्याने डोळे पुसत आहेत’ – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Girish Mahajan | विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे, आज सभापतींची निवड झाली. भाजपाचे राहुल नार्वेकर सभापती म्हणून निवडूण आले. त्यांच्या अभिनंदानाच्या प्रस्तावावर बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजपा नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शाब्दिक चिमटे काढले, यावेळी सभागृहाने सतत हशा पिकत होता. (Ajit Pawar On Girish Mahajan)

 

सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या अभिनंदन प्रस्ताव मांडल्यानंतर अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे टीव्हीवर बोलत होते. आता मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील. हे ऐकताच एकच शांतता पसरली आणि भाजपचे नेते खळखळा रडायला लागले. कुणाला काही कळेना, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. कुणालाच काही कळेना. गिरीश महाजन यांचे रडणे अजून थांबेना. ते अजूनही बांधलेला फेटा काढत आहेत आणि डोळे पुसत आहेत. खर्‍या अर्थाने इतके वाईट वाटत आहे की आता काही करू शकत नाही. अजित पवारांच्या या वक्तव्यावर सभागृहात एकच हशा पिकला. (Ajit Pawar On Girish Mahajan)

 

अजित पवार म्हणाले, मी जेव्हा या सभागृहामध्ये पाहतो, त्यावेळी मुळच्या भाजपच्या मान्यवरांची संख्या कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त दिसतात. तिकडे बसलेले आमचे मान्यवर पाहून भाजपच्या नेत्यांचे वाईट वाटते. आमच्याकडील ही मंडळी तिकडे जाऊन मोठ्या पदावर बसली आहेत. जर पहिली लाईन पाहिली तर गणेश नाईक, बबन पाचपुते, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि मुख्यमंत्री महोदय तुमच्या मागे बसलेले दीपक केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले आहेत. म्हणजे, त्यावेळी आम्ही शिकवलेले वाया गेले नाही, असा टोला अजितदादांनी लगावताच पुन्हा एकदा हशा पिकला.

चंद्रकांत पाटील यांना शाब्दिक चिमटा काढताना अजित पवार म्हणाले, भाजपचे आज 105 आमदार आहेत.
पण सद्सदविवेक बुद्धीला विचारून एकदा सांगा की खरंच समाधान झाले आहे
का, चंद्रकांतदादा बाकडं जास्त वाजवू नका, तुमचं मंत्रिपद येईल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे आताच बाकडं वाजवू नका.

 

अजित पवार पुढे म्हणाले, आमच्याकडून 30-40 आमदार गेले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही हे आता बघावे लागणार आहे.
खरंतर एकनाथ शिंदे आपण बरीच वर्ष एकत्र काम केले आहे.
तुम्ही माझ्या कानात जरी सांगितले असते की उद्धव ठाकरेंना सांगा की अडीच वर्ष झाली,
आता मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. तर मीच तुम्हाला तिथे बसवले असते, काही प्रॉब्लेमच झाला नसता.
काहीच अडचण नसती. असे म्हणत अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांना विचारले की, आदित्य काही अडचण आली नसती ना.

 

Web Title :- Ajit Pawar On Girish Mahajan | girish mahajan is still crying as fadnavis is not cm say ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’