Ajit Pawar On Gyanvapi | ज्ञानवापीवरुन अजित पवारांचा भाजपवर निशाणा; म्हणाले – ‘तीनशे-चारशे वर्षापूर्वीचे आता कशाला काढता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Ajit Pawar On Gyanvapi | आपल्या श्रद्धास्थानाचा मुद्दा काढून आणखी नवे प्रश्न निर्माण करायचे नसतात. तीनशे चारशे वर्षापूर्वी येथे काही तरी होते. तेथे काही तरी होते. असे मुद्दे देशात काढले जात आहेत. जे झालं ते झालं ते कशाला आता का काढता तुम्हाला काही करायचे असेल नविन करा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) चर्चेवरून भाजपवर (BJP) निशाणा साधला. अजित पवार (Ajit Pawar) बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत होते. (Ajit Pawar On Gyanvapi)

 

अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्था (Law and order) अडचणीत आणायची. वातावरण गढूळ करायचे. या गोष्टी बरोबर नाहीत. याची नोंद सर्वांनी घेतली पाहिजे. हा असं म्हणाला आता तुमचं काय म्हणणं आहे? असे काही जण विचारतात. अरे तो म्हणला त्याच्याशी मला काय करायचे आहे. त्याचं म्हणणं त्याला लखलाभ मला माझं लखलाभ असो. एकान काही काही म्हणलं की दुसऱ्यांन काहीतरी म्हणायचं हे काही बरोबर नाही, असेही ते म्हणाले. (Ajit Pawar On Gyanvapi)

 

जीएसटीबाबत (GST) केंद्र सरकार (Central Government) खूप आग्रही आहे. तुम्ही सांगितलेल्या अडचणी फक्त फार तर जीएसटी कॉन्सिल (GST Council) समोर मांडू.
परंतु राज्य सरकारला (Maharashtra State Government) त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही.
जीएसटी बाबत ज्या सुचना केल्या आहेत. त्याची तंतोतंत अंमलबजावणी कारणे गरजेचे आहे.
त्यामध्ये तुमची अडचण होते. हे मलाही कळते.
अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करु मात्र त्याकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला यावेळी त्यांनी बांधकाम व्यवसायिकांना (Builder) दिला.

तुम्हीच ती लोकं निवडून देता
ज्या जिल्ह्याला मुख्यमंत्रीपद मिळाले, उपमुख्यमंत्री पद आतापर्यंत मिळाले त्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरातील पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे.
तिथे शिक्के मारायला आम्ही आलो नव्हतो. तुम्हीच ती लोकं निवडून देता. मला कोणावरही टीका करायची नाही.
अशा शब्दात अजित पवार यांनी लाकडी निंबोडी योजनेवरुन सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकिय परिस्थितीवर भाष्य केले.

 

Web Title :- Ajit Pawar On Gyanvapi | why do you now draw three four hundred years ago ajit pawar targets bjp from gyanvapi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर, ‘या’ तारखेपासून 27,000 रुपये वाढू शकते तुमची सॅलरी!

 

LIC Bima Ratna Plan | एलआयसीने लाँच केला नवीन प्लान ! रू. 5,000 जमा केल्यास मिळतील जबरदस्त बेनिफिट्स, बोनसची सुद्धा गॅरंटी

 

Sikkim Major Accident | सिक्किमध्ये खोल दरीत कार कोसळली, महाराष्ट्रातील पाच पर्यटकांसह 6 जणांचा मृत्यू