Ajit Pawar On Indu Mill | इंदू मिलबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Indu Mill | आज राज्यभर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर (BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar) यांची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचनिमित्त एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदू मिल स्मारकाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

 

इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे.
निधीची (Fund) कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, अशा सूचना आम्ही केल्या आहेत.
सिद्धार्थ कॉलेजसाठी (Siddhartha College) 11 कोटी 45 लाख रुपये देण्यात आले असून तिथे सुद्धा काम सुरू असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

 

बाबासाहेबांनी सर्वांना लढायचं बळ दिलं असून देशाला एकजूट ठेवता आली त्यामध्ये बाबसाहेबांच्या संविधानाचा (Constitution) मोठा वाटा आहे. शिका आणि संघटित व्हा हा संदेश बाबासाहेबांनी दिला.
गरीब वंचित आणि दुर्बल घटकांसाठी ते लढले याचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.

 

दरम्यान, आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भीमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.

 

Web Title :- Ajit Pawar On Indu Mill | bhim jayanti 2022 ajit pawar on indu mill siddharth collage babasaheb ambedkar jayanti

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा