Ajit Pawar on IPS Deepak Pandey | CP दीपक पांडे यांच्या वादग्रस्त पत्राचे पडसाद थेट मंत्रिमंडळात; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on IPS Deepak Pandey | महसूल विभागाच्या (Revenue Department Maharashtra) अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स (RDX) आणि डिटोनेटर (Detonator) सारखे आहेत. यातून एक जिवंत बॉम्ब तयार होत असून तो भूमाफियांच्या मर्जीप्रमाणे वागतो. हे भूमाफिया महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य नागरिकांचा छळ करून वित्तीय आणि जिवितास धोका निर्माण करत आहे. असे गंभीर आरोप करत नाशिकचे (Nashik) पोलीस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी याबाबतचे पत्र थेट डिजीपींना (DGP) पाठवले होते. आता याचे पडसाद थेट राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet) बैठकीत पोहचले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हे पत्र वाचून दाखवले आहे. ”पोलीस अधिकारी यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार कोणी दिला,”
असे म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिपक पांडे यांनी महसूल विभागाच्या संदर्भात वादग्रस्त पत्र लिहिलं होतं. (Ajit Pawar on IPS Deepak Pandey)

काय म्हणाले दिपक पांडे ?
”नाशिक जिल्ह्याच्या (Nashik News) धर्तीवर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर यासह नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर ह्या संपूर्ण जिल्ह्यास पोलीस आयुक्तालय घोषीत करावं अशी मागणी केली.
एकाच जिल्ह्यात 2 – 2 यंत्रणा असल्यानं, जिल्हा दंडाधिकारी कार्यालय येथे दंडाधिकारी शाखा आणि पोलीस आयुक्त कार्यालयात असणारी दंडाधिकारी शाखा यांच्या कामाचे स्वरूप एकच असल्यानं जिल्हा दंडाधिकारी शाखा पोलीस आयुक्त कार्यालयात विलीन कराव्यात, ग्रामीण पोलीस दलाचे आयुक्तालयात विलीनीकरण करावे याने साधन संपत्तीची बचत होईल.
तसेच महसूल यंत्रणेकडून कार्यकारी दंडाधिकारी पदाचे अधिकार काढून घ्यावेत,” अशी मागणी त्यांनी डिजीपींकडे केली होती.

 

Web Title :- Ajit Pawar on IPS Deepak Pandey | cabinet meeting ajit pawar expressed his displeasure over the controversial letter of nashik police commissioner ips deepak pandey

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा