Ajit Pawar On Junnar Leopard Project | ‘तो’ आरोप धांदात खोटा – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Junnar Leopard Project | विधानसभा अधिवेशनात बिबट्या सफारी केंद्र (Leopard Safari Center) बारामतीला (Baramati) सूरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर जुन्नर तालुक्यातील शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली. यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण देताना, प्रकल्प पळवल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचं सांगितलं. (Ajit Pawar On Junnar Leopard Project)

 

जुन्नरचा (Junnar) बिबट्या प्रकल्प हा बारामतीला हलवला हे धादांत खोटं आहे. बारामतीचा प्रकल्प हा 2016 ला मंजुर झाला आहे. तर जुन्नरचा प्रकल्प हा वेगळा असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. यावर काहीजण राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडे पर्यावरण विभाग आहे,
वन विभागाकडून जुन्नरमध्ये सर्वे करून बिबट्या सफारीसाठी जागा निश्चित करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
बिबट्या सफारीसाठी कोणता स्पॉट चांगला आहे या पाहणीसाठी वनअधिकारी गेले आहेत.
ते पुढील आठवड्यात अहवाल सादर करतील त्यानंतर अतुल बेनके (Atul Benke) आणि अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन पुढील काम चालू करण्यात येईल, असंही अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात (Pune Rural Police Headquarter) उभारण्यात आलेले सांस्कृतिक सभागृह, कॅन्टीन आणि गाड्यांचा लोकार्पण सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडला.
त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
31 मार्चपर्यंत कर्मचारी कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पवारांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Junnar Leopard Project allegation that junnar leopard project was taken to baramati is false says deputy cm ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा