Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना

छत्रपती संभाजीनगर : Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024 | भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष एकत्रित लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार यांनी लोकसभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. (Ajit Pawar On Lok Sabha Elections 2024)

काल संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. पवार म्हणाले, मराठवाड्यात आपल्याला खासदारांची संख्या वाढवायची आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे.

पवार म्हणाले, आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तुमची ताकद मला या निवडणुकीत कळेल. कुठल्या विधानसभा मतदारसंघात आपण महायुतीचे उमेदवार देणार आहोत ते लवकरच समजेल. परंतु, जमिनीवर पाय ठेवून लोकांमध्ये मिसळले पाहिजे. नुसते वरवर करून चालत नाही.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे होता.
२०१९ च्या निवडणुकीत एआयएमआयएमचे इम्तियाज जलील येथून निवडून आले.
तसेच या लोकसभा मतदारसंघातील २ विधानसभा मतदार संघ भाजपाकडे तर ४ विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Arjun Khotkar On Ajit Pawar NCP Alliance With BJP | राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपाचा,
शिंदे गटाचा काही संबंध नाही; अर्जुन खोतकर म्हणाले…

Sharad Pawar-Ajit Pawar | पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार