Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्यावेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

मुंबई : Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील (Police Patil) अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे. दिंडोरीहून (Dindori) आंदोलक शेतकरी रखरखत्या उन्हातून चालत मुंबईच्या (Mumbai) वेशीवर आले आहेत. त्यांच्याबरोबरची मुख्यमंत्र्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे, तरी सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue)

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव,
शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका,
शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा
जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू
करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान सभेच्यावतीने लाँगमार्च सुरु करण्यात आला आहे. रविवार (दि. 12 मार्च) पासून दिंडोरी (जि.नाशिक) येथून त्याची सुरवात झाली आहे. या लाँगमार्चमध्ये वीस ते पंचवीस हजार आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. आंदोलक मुंबईच्या वेशीवर दाखल झाले आहेत. तरी सरकारने या आंदोलकांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue)

Web Title :-  Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | 20 thousand protesting farmers at the gates of Mumbai in the scorching sun; The government should discuss with the protesting farmers urgently and resolve the issues

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Japan International Cooperation Agency (JICA) | राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची ‘जायका’समवेत चर्चा

Rita India Foundation | रिता इंडिया फाऊंडेशनच्या सौजन्याने ‘महिलांचे आरोग्य आणि जागरूकता’ याविषयावरील कार्यशाळा संपन्न

Sayaji Shinde | अभिनेते सयाजी शिंदेवर पुणे बंगळुरु महामार्गावरील झाडाचे पुनर्रोपण करत असताना मधमाशांकडून हल्ला