Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | ‘सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी लाच घेतली’, अजित पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) जिल्हाधिकारी (Collector), कृषी सहाय्यक (Agricultural Assistant) अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी (Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers) लाच घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावेळी अजित पवारांनी बदलीचे अधिकार ठराविक आमदारांनाच असल्याचे सांगत बदलीच्या रेटकार्डचे आकडे सांगितले.

अजित पवार म्हणाले, माझे अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत ((Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers)). ते सांगतात की, आमचा उल्लेख करु नका, पण आम्हाला अधिकार असले, तरी मंत्रालयातून आलेल्या यादीतील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावे, असे तोंडी आदेश आहेत. त्यातील काहीतर परदेशात गेले आहेत. बदल्या होणं, यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का हा संशोधनाचा मुद्दा आहे.

अजित पवार पुढे म्हणाले, कृषी सहाय्यक पदासाठीचा रेट तीन लाख रुपये असल्याचे वृत्तपत्रात छापून आलं आहे.
लाखो-कोट्यावधी रुपये देऊन आलेले अधिकारी प्रामाणिकपणे काम कसं करु शकतात? शासन आपल्या दारी
(Shasan Aplya Dari) नेलं काय किंवा शासन आणखी कुठं नेलं? तरी शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता
बदलल्या शिवाय काहीही उपयोग नाही. शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक आहे. अधिकाऱ्यांची मानसिकता बदलल्याशिवाय ही फसवणूक थांबणार नसल्याचे अजित पवार म्हणाले.

जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Junnar MLA Atul Benke) याठिकाणी आहेत. त्यांनाही विचारा.
वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी मोठ्या प्रमाणात नाउमेद झाले आहेत.
पत्रकारांनी अधिकाऱ्यांना खासगीत विचारलं तर ते सांगतील. आम्हाला महत्त्वाची पोस्टिंग नकोच.
आमच्याकडून नको ती कामं करुन घेतली जातात. राज्याच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते,
अशी टीका अजित पवारांनी राज्य सरकारवर केली.

Advt.

Web Title : Ajit Pawar On Maharashtra IAS-IPS Transfers | NCP leader ajit pawar serious allegation of bribe for ias ips officer transfer in shinde fadnavis government Maharahstra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे पुन्हा हादरलं ! प्रेम संबंधाला अडथळा ठरणार्‍या पतीची पत्नी व मुलीकडून हत्या; क्राईम वेब सिरीज पाहून केलं काम ‘तमाम’ (Video)

NCP Foundation Day | राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली जय्यत तयारी पण वर्धापन दिन मेळावा अचानक पुढे ढकलला; कारण…

Bal Shivaji Movie Teaser | 350 व्या शिवराज्याभिषेक दिनी रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचा टीझर आऊट; बाल शिवरायांच्या भूमिकेत दिसणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता