Ajit Pawar On Maharashtra Police | राज्यातील पोलीसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले; पोलीसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता, 3 महिन्यात 30 हून अधिक हल्ले (Video)

पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ; पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसवावी – विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Maharashtra Police | राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस चोवीस तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत (Attack On Police Officers). गेल्या तीन महिन्यात तीसहून अधिक हल्ले पोलीसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलीसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने (Shinde-Fadnavis Govt) जरब बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar On Maharashtra Police)
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात पोलीसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. पोलीसांवर हल्ला झाल्याच्या जवळपास तीसहून अधिक घटना मागील तीन महिन्यात घडल्या आहेत. अंगवार थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलीसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनात वाढ झालेली आहे. एकंदरितच राज्यात पोलीसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इ.गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे.
पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यावर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे.
दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी शासनाने (Maharashtra State Govt) करावयाचे प्रयत्न,
पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
Web Title :- Ajit Pawar On Maharashtra Police | Increase in attacks on Maharashtra police in the state; Likely to affect police morale, more than 30 attacks in 3 months – Ajit Pawar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
To Remove Bad Smell | शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय; जाणून घ्या