Ajit Pawar On MSRTC Workers Strike | अजित पवारांचा अखेरचा इशारा; म्हणाले – ‘शिस्तीत गाडीत बसा नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On MSRTC Workers Strike | मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या राज्यातील एसटी कामगारांचा संप (ST Workers Strike) अद्यापही तसाच प्रलंबित आहे. त्यानंतर अनेक कामगार कामावर रुजू झाले आहेत. उर्वरित कामगार एसटी विलीनीकरणाच्या मागण्यांवर ठाम आहेत. दरम्यान एसटीचे विलीनीकरण होत नसल्याचे नुकतंच राज्य सरकारने (Maharashtra Government) स्पष्ट केलं आहे. तरीही काही कामगार कामावर रुजू झाले नाहीत. दरम्यान यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडक इशारा दिला आहे. (Ajit Pawar On MSRTC Workers Strike)

 

”जे एसटी कर्मचारी अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत त्यांना अखेरची संधी देण्याची मुदत आज संपत आहे. ते कर्मचारी हजर झाले नाही तर त्यांच्याबाबत उद्यापासून मात्र कठोर निर्णय घेतला जाईल. असा सक्त इशाराच अजित पवार यांनी आज दिला. तसेच, एसटी कर्मचारी यांच्याबाबत सरकारने आतापर्यत लवचिक धोरण स्वीकारले होते. त्यांचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही याची कल्पना त्यांना दिली आहे. त्यांचे पगार वाढवून दिले, सुविधा दिल्या. तरीही ते जर आपल्या मागण्यांवर ठाम असतील तर सरकारलाही विचार करावा लागेल. असं ते म्हणाले. (Ajit Pawar On MSRTC Workers Strike)

तसेच, एसटी कामगारांच्या संपामुळे जनतेचे अतोनात हाल होत आहेत.
त्यामुळे आता कारवाई करण्याची वेळ आली. जे कामगार कामावर हजर होणार नाहीत त्यांची सेवा संपुष्ठात आणण्याची कारवाई होऊ शकते. त्यांच्या जागी नवीन कामगार आणण्यात येऊ शकतात, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, मुंबईत बेस्ट (Mumbai Best Bust) आणि पुण्यात पीएमपीच्या (Pune PMPML Bus) बसेस आहेत. प्रति किलोमीटर त्यांचा होणाऱ्या खर्च हिशोब काढला तर आताच्या खर्चापेक्षा कमी खर्च येत आहे. एसी बस असल्यामुळे प्रवाशांनाही अधिक सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आमच्यासमोर अनेक पर्याय असल्याचं ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar On MSRTC Workers Strike | ajit pawars last warning to msrtc workers there are so many options

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा