Ajit Pawar On MVA Government | अजित पवारांनी सरकारबद्दल स्पष्टच सांगितलं, म्हणाले – ‘तोवर महाविकास आघाडी सरकारला काही होणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On MVA Government | राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) पडण्याबाबत अनेक तर्क वितर्क गेल्या काही महिन्यापासून लढवले गेले. दरम्यान याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे. ”सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हे सरकार 5 वर्षे पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे, त्यामुळे तोवर या सरकारला काही होणार नाही.” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावेळी पवार पुण्यात (Pune News) एका बैठकीत बोलत होते. (Ajit Pawar On MVA Government)

 

”सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हे सरकार 5 वर्षे पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे, त्यामुळे तोवर या सरकारला काही होणार नाही.”
अधिवेशनाच्या आगोदर अनेक विधाने केली गेल्याचे सांगत तारखादेखील जाहीर केल्या होत्या.
या दरम्यान आता अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपाकडून मागील काही दिवसांपासून सरकार पडणार या विधानाच्या प्रश्नाला पुर्ण विराम मिळाला आहे.

 

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ”युक्रेन (Ukraine), रशिया (Russia) यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल डिझेलच्या (Petrol Price) किंमती आणखी वाढणार आहे.
तसेच, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्यास सुरूवात झाली.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला असल्याचं पवार म्हणाले.’

 

 

Web Title :- Ajit Pawar On MVA Government | ajit pawar on mva mahavikas aghadi government in pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा