Ajit Pawar on Navneet Rana | ‘…हे तपासण्याचं अजुन तरी आपल्याकडे यंत्र नाही’; अजित पवारांचा नवनीत राणांना टोला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on Navneet Rana | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्याबाबत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. ज्यांना आपण पुरस्कृत करतो ते आपल्यासोबतच राहतील का ?, हे तपासण्याचं आपल्याकडे अजून तरी यंत्र नसल्याचं म्हणत अजित पवारांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (Congress-NCP Goverment) सरकार पुन्हा येईल असं कोणाला वाटलं नव्हतं. एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि भाजप एकत्र होते. मात्र आज ममतादीदी एकत्र आहेत. बिहारमध्ये (Bihar) कधी नितीश कुमार (Nitish Kumar) हे भाजपसोबत असतात तर काहीवेळा भाजपविरोधात होतात. त्यामुळे अशा घटना इथेच नाहीतर भारतभर घडत असतात, असं अजित पवार म्हणाले. यावेळी बोलताना पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही (MNS Chief Raj Thackeray) निशाणा साधला.

 

दरम्यान, राज ठाकरे हेसुद्धा 2019 च्या निवडणुकीवेळी भाजपविरोधी (BJP) भाषणे देत होते.
मात्र त्यांनीच आता पवित्रा बदलला असल्याचं पवार म्हणाले.
मनसेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना जातीयवादी म्हटलं असतं का ?, राज ठाकरे भाजपवर टीका करत नाहीत फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका करत असतात.
मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केलं असल्याचं पवार म्हणाले.

दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज पार पडलेल्या सुनावणीमध्येही राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला नाही.
न्यायाधीश राहुल रोकडे (Justice Rahul Rokade) यांनी न्यायालयाकडे आज जराही वेळ नसल्याचे स्पष्ट केले.
त्यामुळे राणा दाम्पत्याला जामिनासाठी अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.

 

Web Title :- Ajit Pawar On Navneet Rana | ajit pawar makes big statement about navneet rana and ravi rana whom supporting bjp mns raj thackeray agenda

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा