Ajit Pawar On Navneet Ravi Rana | अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा, म्हणाले – ‘तुम्ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Navneet Ravi Rana | अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर (Matoshree) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणासाठी जाणार का याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. दुसरीकडे शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांनी सकाळपासून त्यांच्या घरासमोर निदर्शनं करायला सुरूवात केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने पत्रकार परिषदे घेत मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती दिली. मात्र दुपारी पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar On Navneet Ravi Rana)

 

कोणावरच हल्ला व्हायला नको, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येकाने शांततेत घ्यायला हवं मात्र आपणही कोणाला उसकवण्याचा प्रयत्न करायला नको, असं अजित पवार म्हणाले. सकाळी मुंबईमध्ये (Mumbai) या प्रकरणावर बोलताना माध्यमांशी संवाद साधला.

आपल्या वक्तव्याने नवीन प्रश्न निर्माण होणार हे माहित असताना जाणीवपुर्वक वक्तव्य करणं, आमचे मंत्रिमहोदय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सांगत होते की तिथे जाणं एवढं सोप्पं नाही, सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे ना एवढा अट्टाहास कशाला?, असा सवाल पवारांनी केला.

 

दरम्यान, तुम्हाला असं काही करायचं होतं तर तुमच्या घरासमोर करायचं ना,
तुमच्या घरात करा, मंदिरात करा त्याला कोणाचाच विरोध असायचं काही कारण नाही, असं अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- deputy cm ajit pawar slams navneet ravi rana on hamuman chalisa matoshree mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा