Ajit Pawar On Neelam Gorhe | ‘निलमताई, तुमच्यासाठी थांबलो होतो, पण परबांनी ऐकलं नाही; तुम्ही शिवसेनावाल्यांनी आपापलं बघून घ्यावं’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Neelam Gorhe | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्यााचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा दौऱ्यासाठी भर पहाटे घराबाहेर पडून त्याठिकाणी हजर होत असतात. ही एक त्यांच्या कामाची शैली सर्वानाच माहिती आहे. दरम्यान, अजित पवारांच्या याच सवयीमुळे पुण्यातील इलेक्ट्रिक बसच्या लोकार्पण सोहळ्यात (Dedication Ceremony of Electric ST Bus in Pune) घडलेल्या एका किस्स्याची चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. (Ajit Pawar On Neelam Gorhe)

 

पुण्यात आज (बुधवारी) सकाळी इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लवकरच कार्यक्रमास्थळी दाखल झाले. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) याही उपस्थित राहणार होत्या. पण त्यांना यायला उशीर झाला. त्या येण्यापूर्वीच कार्यक्रम सुरू झाला. यानंतर अजित पवार आणि निलम गोऱ्हे यांच्यात चांगलंच शाब्दिक युद्ध रंगलं असल्याचे पाहायला मिळाले. (Ajit Pawar On Neelam Gorhe)

लोकार्पण कार्यक्रमादरम्यान बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या की. “तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, अतिशय कार्यक्षम आहात. आमच्या अनेक प्रश्नांना तुम्ही वेगाने न्याय मिळवून देता. पण तुमचा कार्यक्रम पुण्यात असतो तेव्हा मी विचार करते की, आयोजकांना सांगावं का, आदल्या दिवशी आमची झोपायची व्यवस्था इकडे करा. आम्ही तुमच्यापेक्षा कितीही लवकर यायचा प्रयत्न केला तरी तुम्ही आमच्या आधीच येता. ९ च्या कार्यक्रमासाठी पावणेनऊला पोहोचलं तर अजितदादा साडेआठला आलेले असतात. इतके ते कार्यक्षम आहेत. पण याचा अर्थ आम्ही उशीरापर्यंत झोपतो, असं नाही,’ असं त्यांनी अजित पवार यांना शाब्दिक चिमटे काढले.

 

त्यावेळी अजित पवार भाषणादरम्यान म्हणाले, “मी इथे लवकर आलो पण 9 वाजेपर्यंत थांबायचे ठरवले होते.
त्यामुळे आम्ही गोल खुर्च्या मांडून गप्पा मारत होतो.
अनिल परब (Anil Parab) हेही आमच्यासोबत होते. निलमताई, तुम्ही अगदी योग्य वेळेत कार्यक्रमाला आलात.
तुमच्यासाठी आम्ही थांबलो होतो. पण नंतर परब साहेबच म्हणाले की, कार्यक्रम सुरु करा. मी त्यांना सांगितलं की, निलमताई येतील, त्या उभसभापती आहेत, आपण थांबले पाहिजे.
पण परब साहेबांनीच ऐकलं नाही, म्हणाले कार्यक्रम सुरु करा.
आता ते शिवसेनेचे आहात, तुम्हीही शिवसेनेच्या आहात, तेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या,” असं ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
असं म्हणत अजित पवार यांनी निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलं.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Neelam Gorhe | ncp ajit pawar and shivsena anil parab neelam gorhe verbal exchange in pune electric bus inauguration event at balgandharva rang mandir

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा