Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील ओबीसींना आरक्षण मिळणार” – अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar on OBC Political Reservation | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मध्य प्रदेशमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला (Madhya Pradesh OBC Political Reservation) ग्रीन सिग्नल दिल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची (Maharashtra OBC Political Reservation) चर्चा रंगली आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकात प्रचंड आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता सरकारने बांठिया समितींची (Banthia Committees) नियुक्ती केली असून अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. (Ajit Pawar on OBC Political Reservation)

 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ”राज्यातही महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) मध्यप्रदेशच्या धर्तीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी बांठिया समिती नेमण्यात आली असून अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर येत्या जूनमध्येच हा अहवाल सुप्रीम कोर्टात मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मध्यप्रदेशने काय दाखल केले ते सरकारने पाहिले आहे. त्यानुसारच राज्याचा अहवाल असून महाराष्ट्रातही ओबीसींना आरक्षण मिळेल.” असं ते म्हणाले.

 

राज्यसभेबाबत अजित पवार म्हणाले…

”राज्यसभेच्या 6 जागा आहेत त्यामध्ये 2 जागा भाजपच्या वाट्याला येतात.
शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळेल. काँग्रेसच्या वाट्यालाही 1 जागा येते.
जेवढी मते शिल्लक राहतात त्यात सर्वाधिक मते शिवसेनेची राहणार आहेत. सहसा स्वतंत्र पक्ष असतात ते सत्ताधारी पक्षाचे ऐकतात.
त्यामुळे पुढे काय होते ते पाहावे लागेल. कुणी किती जागा लढवायच्या तो त्यांचा प्रश्न आहे.
सूचक ज्यांना जास्त त्यांना जास्त जागा मिळतील. संभाजीराजेंबद्दल (Sambhaji Raje) मला काहीच माहिती नाही.
याबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत चर्चा झाली असेल तर त्यांना विचारण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचं,” अजित पवार म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar on OBC Political Reservation | ajit pawar says will go in supreme court for obc reservation in local body elections mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा