Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये कशावर चर्चा झाली?; अजित पवारांनी अंदाज व्यक्त करत सांगितलं कारण

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेटीची देशभर चर्चा आहे. देशातील दोन दिग्गज नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. भेटीमधील चर्चेबाबत अनेक अंदाज बांधले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. (Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting)

 

गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांची नियुक्ती रखडली आहे. आम्ही अनेकदा विनंती करूनही उपयोग झालेला नाही त्यानंतर आम्ही पवार साहेबांना वरिष्ठ पातळीवर बोलायला सांगितलं होतं. त्यानुसार पवारांनी ही भेट घेतली असावी, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावर बोलताना,
शरद पवार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची (Bhagat Singh Koshyari) तक्रार करण्यासाठी गेलं असल्याचं म्हणाले होते.
मात्र आता काही वेळात शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार असून ते याबाबत माहिती देणार आहेत.

दरम्यान, शरद पवार आणि नरेंद्र मोदी (Pawar-Modi Meeting) यांची जेव्हा जेव्हा भेट होते त्यावेळी देशभर चर्चा होते.
मात्र आता ज्या टायमिंगला भेट झाली आहे त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

 

Web Title :- Ajit Pawar On PM Modi-Sharad Pawar Meeting | deputy cm ajit pawars reaction over ncp chief sharad pawar and pm modi meet in delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PM Modi-Sharad Pawar Meeting | शरद पवारांनी का घेतली PM मोदींची भेट ? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

 

The 3 Stages of Love | प्रेमात 3 स्टेजमधून जातो तुमचा मेंदू, या स्टेजमध्ये होतो हार्मोनल स्फोट

 

Urfi Javed Instagram Video | उर्फी जावेदच्या इंन्टाग्रामवरील व्हिडिओनं सोशल मीडियावर लावली आग; ती म्हणाली – ‘बेगम बगैर बादशाह कीस काम का…’

 

Sudhir Mungantiwar On NCP-Shivsena | ‘शिवसेनेनं बेईमानी केली, भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कटुता नाही’ – सुधीर मुनगंटीवार