Ajit Pawar On Pune Nashik Highway | शेतकऱ्यांचा विरोध व तीव्र भावना लक्षात घेत पुणे-नाशिक द्रुतगती मार्गाला तात्पुरती स्थगिती ; अजित पवारांच्या सूचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar On Pune Nashik Highway | खेड, आंबेगाव व जुन्नर या तालुक्यांतून जाणाऱ्या पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. शेतकऱ्यांचा विरोध व तीव्र भावना लक्षात घेऊन सहकारमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात बैठक झाली.(Ajit Pawar On Pune Nashik Highway)

या बैठकीमध्ये पुणे नाशिक द्रुतगती मार्गाला तात्पुरती स्थागिती देण्यात आलेली आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या प्रक्रियेला आज स्थगिती दिली आहे.

त्या स्थितीत काम थांबवून महामार्गाचा फेरविचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्र्यांनी इतर पर्यायांवर विचार करण्याचा आदेश दिल्याची माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

पूर्वीच्या पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण व अनेक ठिकाणी बायपास झाले आहेत. रेल्वेसाठी काही ठिकाणी भूसंपादन
झाले आहे. इतरही दोन महामार्ग या भागातून प्रस्तावित आहेत. चाकण, तळेगाव, शिक्रापूर या भागात वाहतूक कोंडी होत आहे.
तेथे उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

जुन्या महामार्गात काही ठिकाणी रुंदीकरण केल्यास प्रश्न मार्गी लागू शकतो, असे वळसे पाटील म्हणाले.
या वेळी आमदार दिलीप मोहिते व अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अनिल वाळुंज,
अशोक आदक पाटील, बाळशीराम वाळुंज, अशोक वाळुंज व अधिकारी उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anil Deshmukh On Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ‘मृत तरुण-तरुणी दारु पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न’ माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Bibvewadi Gangadham Chowk Pune News | गंगाधाम चौक परिसरातील रस्ते भविष्यात होणार मृत्यूचे जाळे? वाढत्या जड वाहतुकीमुळे तीव्र उतारावर वाहनचालकांचा जीव मुठीत घेउन प्रवास (Videos)