Ajit Pawar On Pune Water Supply | पुणे महापालिकेने शहरात समान पाणी मिळेल यासाठी योग्य व्यवस्थापन करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Pune Water Supply | खडकवासला धरणातील (Khadakwasla Dam) पाण्याचे योग्य नियोजन करुन नवा मुठा उजवा कालव्याचे (Mutha Cane) सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह अजून एक उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे. पुणे शहरातही महानगरपालिकेने (Pune Corporation) पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन सर्वत्र समान पाणी मिळेल, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Pune Water Supply) यांनी आज कालवा समितीच्या बैठकीत (Kalwa Samiti Meeting Pune) प्रशासनाला दिले.

 

खडकवासला प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीत पुण्याच्या पाणी प्रश्नावर चर्चा झाली. शहरातील सर्व आमदारांनी पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे नमूद केले. बापट यांनी महापालिकेमध्ये प्रशासक नियुक्त झाल्यानंतर पाण्याचे नियोजन चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. एका भागात अर्धा तास तर दुसर्‍या भागात चार तास पाणी पुरवठा केला जात आहे अशी तक्रार केली. सर्वच नागरीक कर भरतात, त्यामुळे सर्वांनाच समान पाणी मिळाले पाहीजे असे नमूद करीत बापट यांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत सभात्याग केला. बापट यांनी घेतलेल्या भुमिकेचे सर्वच आमदारांनी समर्थन केल्याची माहीती आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांनी दिली. (Ajit Pawar On Pune Water Supply)

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

दरम्यान, भामा आसखेड प्रकल्पातून (Bhama Askhed Project) पुण्यासाठी प्रति दिन दोनशे एमएलडी इतके पाणी मंजुर झाले आहे. त्यापैकी केवळ १३५ एमएलडी इतकेच पाणी महापालिका उचलत आहे. उर्वरीत ६५ एमएलडी पाणी का घेतले जात नाही असा प्रश्न याबैठकीत उपस्थित केला गेला. हे पाणी पुर्ण क्षमतेने उचलण्यासाठी जलवाहीन्या आणि पंपिंग स्टेशनचे काम करावे लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सुचना पालकमंत्री पवार यांनी केल्या. आमदार चेतन तुपे यांनी खराडी ते साडेसतरा नळी पाईपलाईनद्वारे भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी उचलण्याचा पर्याय सुचवला. त्यावर याबाबत व्यवहार्यता, तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक कार्यवाहीच्या सूचना त्यांनी महानगरपालिकेला (PMC) दिल्या.

समाविष्ट गावांतील कामांच्या चार निविदा काढा
महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावांतील पाणी पुरवठ्यावरही या बैठकीत चर्चा झाली.
या गावांतील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तेथे अतिरीक्त पंप ठेवा अशी सुचना आमदार भीमराव तापकीर यांनी केली होती.
त्यावरही कार्यवाही करण्याची सुचना पालकमंत्री पवार यांनी दिली.
तसेच समाविष्ठ गावांतील पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने सुमारे साडे पाचशे कोटी रुपयांची निविदा काढली आहे.
जलवाहीन्या टाकणे, टाक्या बांधणे आदी कामे यात केली जाणार असुन, ही कामे तीन वर्षात पुर्ण केली जाणार आहे.
याविषयी पालकमंत्री पवार यांनी ही कामे वेळेत पुर्ण करण्यासाठी या कामांच्या चार निविदा काढल्या जाव्यात अशी सुचनाही केली आहे.

 

गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा
खडकवासला प्रकल्पात गतवर्षीपेक्षा २.५ TMC पाणी कमी आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
त्यासंदर्भात पवार यांनी संबंधितांनी पाणीबचतीसाठी योग्य व्यवस्थापन करावे,
शहरात तसेच ग्रामीण भागातही कालव्यावर कोठे काही पाणीचोरी होत असेल, गळती होत असेल तर कठोर कारवाई करावी,
परंतु सर्वांना समान न्यायाने पाणी मिळेल असे व्यवस्थापन करावे.
पुणे महानगरपालिकेने पाणी योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे अशा सुचना केल्या आहेत.

 

 

Web Title :- Ajit Pawar On Pune Water Supply | Pune Municipal Corporation should make proper arrangements to get equal water in the city – Order of Deputy Chief Minister Ajit Pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | पुणे शहरात समान पाणी पुरवठा होत नसल्याबद्दल खा. गिरीश बापट यांचा कालवा समितीच्या बैठकीतून सभात्याग

 

Namrata Malla Dance Video | समुद्राच्या मध्यभागी नम्रता मल्लानं केला ‘दो घूंट’ या गाण्यावर डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

High BP | किडनीमध्ये समस्या असेल तरी सुद्धा होऊ शकते ‘हाय ब्लड प्रेशर’, जाणून घ्या ‘बीपी’ हाय होण्याची 5 कारणे