Ajit Pawar On Raj Thackeray | ‘कोण तुकडोजीराव विचारतोय महाराजांबद्दल ?’; अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी तिसऱ्या सभेतही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचं नाव शरद पवार कधी घेत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. त्यासोबतच शरद पवार यांनी जाती जातीत भांडणं लावली असा आरोपही त्यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना फैलावर घेतलं असून त्यांच्यावर निशाणा साधला.

 

उचलंली जीभ लावली टाळ्याला. अरे, माणसांचे संसार उभे करायला डोकं लागतं. अक्कल लागते. धुडगूस आणि तोडमोड करायला अक्कल लागत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात, ध्यासात आणि नसानसात आहेत. कोण तुकडोजी विचारत आहे महाराजांबद्दल ?, त्यांना महाराज समजलेच नाहीत. फक्त दुकानदारी चालवण्यासाठी ते महाराजांचं नाव घेत असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

ही सगळी नौटंकी आहे, याची नक्कल कर, शरद पवारांची, मंत्री छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) नक्कल कर कधी माझी नक्कल कर,
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची (Jayant Patil) नक्कल कर, अरे नकलाकार आहेत की भाषण करायला आले आहेत,
असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता निशाणा साधला.

 

दरम्यान, तुमचं जेवढं वय आहे तेवढं शरद पवार यांचे काम आहे. नकला करून पोट भरत नाही, लोकांची माथी भडकावू नका,
असंही अजित पवार म्हणाले.

 

Web Title :-  Ajit Pawar On Raj Thackeray | DCM and ncp leader ajit pawar strongly criticized on mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा