Ajit Pawar On Raj Thackeray | शरद पवारांवर ‘जातीपाती’चा आरोप ! अजित पवार राज ठाकरेंवर संतापले; म्हणाले – ‘मुलाखत घेतली तेव्हा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Raj Thackeray | शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीपातीचं राजकारण (Caste Politics) केलं किंबहुना राष्ट्रवादीच्या (NCP) जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला, अशी टीका मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या पाडवा मेळाव्यात बोलताना केली. त्यांच्या टिकेला खुद्द शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रत्युत्तर दिलं. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर संताप व्यक्त केला आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

काय म्हणाले राज ठाकरे ?
मुंबई (Mumbai) तसचे मुंब्रा (Mumbra) येथील झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यावर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना (PM) करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशा मागणी राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे (Maharashtra State Government) केली. सरकारने भोंगे उतरवले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) वाजवा, असा आदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिला. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून राज्यात जातीपातीचे राजकारण सुरु झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

त्यावेळी जातीयवादी वाटले नाहीत…
राज ठाकरे यांच्या आरोपावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, एकेकाळी तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घेता आणि तोंडभरुन कौतुक करता.
असा काय चमत्कार घडला ? त्यावेळी मुलाखत घेताना शरद पवार यांना जातीयवादी वाटले नाहीत आणि काही दिवसातच जातीयवादी वाटू लागले.
शरद पवार आज राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आहेत का ? शरद पवार 1962 पासून युवक काँग्रेसमध्ये (Youth Congress) काम करत आहेत.
त्यावेळी या लोकांचे जन्मही झाले नव्हते.
अशा लोकांनी शरद पवार यांच्यावर टीका टिप्पणी करणं म्हणजे सूर्याकडे पाहून थुंकल्यासारखं आहे. राज ठाकरे यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

 

Web Title :- Ajit Pawar On Raj Thackeray | ncp ajit pawar on raj thackeray sharad pawar caste politics in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा