Ajit Pawar On Rajyasabha Seat | राज्यसभेच्या 6 व्या जागेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले – ‘निर्णय…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Rajyasabha Seat | महाराष्ट्रातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Elections) सहा जागेसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 10 जून रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान राज्यातील सहा जागा असून त्यामधील सहाव्या जागेबाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (CM Uddhav Thackeray) घेतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.

 

माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ”राज्यसभेच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची बैठक झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर मंगळवारी आमची एक बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे होत असून, या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या, यावर चर्चा होणार असल्याचे,” ते म्हणाले.

 

”काँग्रेसकडेही काही जादा मते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांची 7 ते 8 मते जास्त आहेत, तर शिवसेनेकडे 18 ते 20 मते जास्त आहेत.
मागील राज्यसभा निवडणुकीवेळी महिलेस राज्यसभेवर पाठविण्याबाबत शरद पवार यांच्या शब्दाला मान देऊन मुख्यमंत्र्यांनी मदत केली होती.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील तोच निर्णय 6 व्या जागेबाबत होईल.
शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीमध्ये शरद पवार ठरवतील तो निर्णय अंतिम असतो,”
असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar On Rajyasabha Seat | decision on sixth seat for rajyasabha in maharashtra will be taken by chief minister says ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा